Weight loss: ओवा-जिऱ्याचा हा चहा वजन कमी करण्यास करेल मदत

तब्येत पाणी
Updated May 03, 2021 | 12:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

ओवा आणि जिरे या दोन्हीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये नियमितपणे याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

detox tea
ओवा-जिऱ्याचा हा चहा वजन कमी करण्यास करेल मदत 

थोडं पण कामाचं

  • ओवा तुम्हाला पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतो
  • तज्ञांच्या मते एकदा वजन वाढले की ते कमी करणे ही सोपी गोष्ट नव्हे.
  • हे दोन्ही पदार्थ पाण्यात भिजवल्यानंतर याचे गुणधर्म अधिक वाढतात

मुंबई: तुम्हाला तुमच्या शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करायची आहे का? तुम्हाला हे कठीण वाटतंय का? तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एकदा नजर टाकावीच लागेल. इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि सुपर हेल्दी काळी मिरी, तूप, जिरे आणि ओवा  यांचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. हे पदार्थ एकत्र केल्यास तुम्ही अतिरिक्त वजन कमी करू शकता. अशातच ओवा-जिरे ड्रिंक केवळ तुम्हाला डिटॉक्स करण्यास मदत करत नाही तर वजनही कमी होण्यास मदत होते. 

तज्ञांच्या मते एकदा वजन वाढले की ते कमी करणे ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. यासोबतच ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या मसल्यांपासून चहा बनवू शकता. या चहाचा वापर तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठीही करू शकता. विशेषकरून ओवा-जिऱ्याचा चहा वाढते वजन नियंत्रित कर शकता. 

कसे मदत करते हे ड्रिंक

ओवा तुम्हाला पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतो. यात थायमोल नावाचे केमिकल असते जे गॅस्ट्रिक रस स्त्रावामध्ये मदत करतात. थायमोलमुळे ओव्याला वेगळा स्वाद येतो.ओव्यामध्ये एक प्रकारचे तेल असते. ज्याला थायमॉल असे म्हणतात. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तसेच चांगले पचन होते. जर काही खाल्ल्याने पोट बिघडले असेल तर ओवा खाल्ल्यास जेवलेले जेवण पचते. यासोबतच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते वजन कमी करणारे अनेक जण जिरे ड्रिंकला पसंती देतात. हे दोन्ही पदार्थ पाण्यात भिजवल्यानंतर याचे गुणधर्म अधिक वाढतात. किचनमधील हे दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असे आहेत. 

असा तयार करा चहा

ओवा आणि जिरे हे तिखट चवीचे असतात. डिटॉक्स चहा तयार करण्यासाटी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात ३-४ तास भिजत घाला. तसेच ओवाही भिजत घाला.  अथवा तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता. हे पाणी मध्यम आचेवर कमीत कमी पाच मिनिटांसाठी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि तुमचा चहा तयार आहे. तुम्ही जेवल्यानंतर हे ड्रिंक घेऊ शकता. तसेच यात तुम्ही स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रस, मध, गूळ स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी