सेलिब्रेटींसारखी बॉडी हवीये तर जरूर खा या ५ गोष्टी

तब्येत पाणी
Updated Jul 07, 2019 | 15:29 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जर तुम्ही जिमला जाऊनही सेलिब्रेटींप्रमाणे आपली बॉडी अथवा मसल्स बनवू शकत नाही आहात तर तुमच्या डाएटवर लक्ष द्या. वर्कआऊटनंतरचे डाएट बॉडी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

celebrity
सेलिब्रेटी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: फिट राहण्यासाठी जिम जाणे अथवा भरपूर तास व्यायाम करणे इतकेच गरजेचे नसते तर यासोबतच आपले डाएट चांगला असणे महत्त्वाचे असते. सेलिब्रेटी एक्सरसाईज आणि स्ट्रेथ ट्रेनिंगसोबतच तुम्हाला तुमच्या डाएटवरही फोकस करणे गरजेचे असते. त्यांच्या डाएटमध्टये प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन्स यांचा योग्य बॅलन्स असतो. इतकंच नव्हे तर खाण्याची पद्धत, खाण्याची वेळ आणि खाण्याच्या योग्य गोष्टी त्यांच्या परफेक्ट फिटनेसचे कारण असते. 

अनेक तरुण मुलांसाठी सेलिब्रेटी रोल मॉडेलप्रमाणे असात. त्यामुळे त्यांच्यासारखी बॉडी बनवता यावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी जिम तर लावली जाते मात्र डाएटवरही लक्ष देणे गरजेचे असते. वर्कआऊटनंतर काही गोष्टी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करणे गरजेचे असते. विशेषकरून ज्या तरुणांना मसल्स बनवायचे असतील त्यांनी वर्कआऊटनंतर डाएटमध्ये काही गोष्टी सामाविष्ट केल्या पाहिजेत.

 

वर्कआऊटनंतर जरूर खा ५ वस्तू

  1. डाय फ्रुट्स खा - वर्कआऊटनंतर मूठभर मिक्स ड्रायफ्रुट्स जरूर खा. विशेष करून बदाम, अक्रोड, जर्दाळू, खजूर, मनुका आणि पिस्ता खा. ड्रायफ्रुट्समध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे शरीराला ताकद मिळे. तसेच तुमच्या बॉडीला शेप देण्यासोबतच मसल्सही तयार होतात. यामुळे शरीराचा रोगांपासून बचाव होतो. 
  2. रताळे - रताळे केवळ उपवासाला अथवा वजन वाढवणारा पदार्थ अशी जर तुमची समजूत असेल तर ती वेळीच बदला. रताळे एनर्जीचा जबरदस्त सोर्स आहे. यासोबतच यातील कार्बोहायड्रेट आणि अँटीऑक्सिडंट शरीराला भरपूर एनर्जी देतात. याच कारणामुळे वर्कआऊटच्या आधी अथवा नंतर रताळे खाल्ले पाहिजे. 
  3. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे - अंड्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स असतात. यामुळे स्टॅमिना वाढतो. यासाठी एक्सरसाईज करणाऱ्यांना स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी अंडे दररोज खाल्ले पाहिजेत. व्हिटामिन डी मसल्स आणि हाडांसाठी फायदेशीर असते. त्यामुळे उकडलेली अंडी जरूर खा. तसेच रक्तामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. 
  4. ओट्स - व्हिटामिन बी ने परिपूर्ण ओट्स वर्कआऊटनंतर खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. शरीराच्या अनेक गरजा यामुळे भागवल्या जातात. शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी यासोबतच व्यायामुळे शरीरातील कमतरता पूर्ण करण्यासाठी ओट्स बेस्ट आहे. ओट्स तुम्ही दूध अथवा दह्यासोबत खाऊ शकता. 
  5. केळी - केळ्यामध्ये आर्यन, व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते. केळी तुम्ही वर्कआऊटआधी अथवा नंतर खाऊ शकता. यामुळे नर्व्हस सिस्टीम चांगली होण्यासोबतच मसल्स बनवण्यासाठी फायदेशीर असतात. केळ्याला एनर्जी फूड आणि सगळ्यात चांगले फळ मानले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सेलिब्रेटींसारखी बॉडी हवीये तर जरूर खा या ५ गोष्टी Description: जर तुम्ही जिमला जाऊनही सेलिब्रेटींप्रमाणे आपली बॉडी अथवा मसल्स बनवू शकत नाही आहात तर तुमच्या डाएटवर लक्ष द्या. वर्कआऊटनंतरचे डाएट बॉडी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola