Celebrity Fitness: 52 वर्षांच्या खिलाडी अक्षय कुमारचा फिटनेस फंडा 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. मात्र आजच्या जनरेशनमध्येही अक्षयची रफ, टफ आणि फिट बॉडी आहे. जाणून घेऊया अक्षय कुमारचा फिटनेस फंडा. 

Akshay Kumar fitness exercise and diet plan
Celebrity Fitness: 52 वर्षांच्या खिलाडी अक्षय कुमारचा फिटनेस फंडा   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अक्षय कुमारचं डाएट आणि फिटनेस मंत्र सरळ आहे. मात्र प्रत्येक जण त्याचं पालन करू शकत नाही.
  • यात टाइम मॅनेजमेंटचं नाही तर लाइफस्टाइलमध्ये बदल करणं गरजेचं असते.
  • अक्षय कुमारच्या फिटनेसमध्ये कोणताही शॉर्टकट नाही आहे. जो काही त्याचा दररोजचा रूटीन ठरलेला आहे तो रोज तसाच फॉलो केला जातो

Akshay Kumar Fitness : अक्षय कुमारचं डाएट आणि फिटनेस मंत्र सरळ आहे. मात्र प्रत्येक जण त्याचं पालन करू शकत नाही. कारण यात टाइम मॅनेजमेंटचं नाही तर लाइफस्टाइलमध्ये बदल करणं गरजेचं असते. अक्षय कुमारच्या फिटनेसमध्ये कोणताही शॉर्टकट नाही आहे. जो काही त्याचा दररोजचा रूटीन ठरलेला आहे तो रोज तसाच फॉलो केला जातो आणि याच कारणामुळे वयाच्या ५२ व्या वर्षीही खिलाडी अक्षय कुमार तरूण दिसतो. 

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अक्षय एक मार्शल आर्ट तज्ज्ञ होता. त्यामुळे त्याचा फिटनेससोबतचा संबंध आणखी मजबूत झाला. अक्षयची शानदार टोन्ड बॉडी आणि तरूण दिसण्यामागे एक नाही तर बरीच कारणं काम करतं. कदाचित त्याच्या काळात हा एकमेव बॉलिवूड स्टार होता ज्यानं बर्‍याच सिनेमांमध्ये स्वत: हूनच स्टंट केले आणि आपण किती फिट आहे हे सिद्ध केले.  त्याचा फिटनेस मंत्र, रात्रीची चांगली झोप, निरोगी आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या आहेत. तर अक्षय कुमारच्या ५२ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या डाएट आणि फिटनेसवर एक नजर टाकूया. 

अक्षय कुमार सर्व काही खातो पण योग्य वेळेत 

अक्षय कुमार सर्व खाण्यावर विश्वास करतो. मात्र तो सर्व योग्य वेळेवर आपलं खाणं खातो. तो प्रत्येक दिवशी संध्याकाळी ७ वाजण्याआधी आपलं रात्रीचं जेवण करतो. त्यानंतर तो काहीच खातं नाही. जरीही अक्षय कधी पार्टीला किंवा शूटिंगसाठी बाहेर असेल तरी तो रूटीन डाएटमध्ये काहीच बदल करत नाही. याव्यतिरिक्त अक्षय कधीच मद्यपान, सिगरेट एवढंच काय तर कॅफिन घेत नाही. अक्षय कुमार चहा आणि कॉफीपासूनही दूर राहतो. अक्षयचं म्हणणं आहे की, जर तुम्ही धूम्रपान करता किंवा मद्यपान केले तर व्यायामासाठी तुमच्याकडे सहनशक्ती नसते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kicking the midweek blues like #FitIndia #FitLife

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

एक ग्लास हळदीचं दुध घेणे महत्वाचे

अक्षय कुमार बॅलेंस्ट डाएट घेतात. घरात जे काही बनतं तेच अक्षय खातो. मात्र त्याचे योग्य प्रमाण असते आणि ब्रेकफास्टपासून लंच डिनरपर्यंत जी वेळ ठरलेली आहे. त्याच वेळेत खातो. अक्षयचं म्हणणं आहे की, गरम पाण्यासोबत एक चमचा मध आणि हळदीचं दूध यामुळे इम्युनिटीच्या मजबूतीसाठी खूप गरजेचं आहे. अक्षय हे दररोज घेतो. ब्रेकफास्टमध्ये दूध आणि पराठा, दुपारी फळं किंवा नट्स, ब्राऊन राईस आणि भाज्यांसोबत डाळ आणि रात्रीच्या खाण्यात सूप आणि चटपटी भाज्या खातो. खाण्यात अक्षय बऱ्याचंदा अंड्यातील सफेद बलकचे ऑम्लेट खातो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

अक्षय रोज आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो

अक्षय कुमारला फिटनेसची आवड आहे, पण अक्षय म्हणतो की, केवळ एब्ससाठी व्यायाम करणं ही माझी आवड नाही. अक्षय किक बॉक्सिंग आणि शॅडो बॉक्सिंगसोबत तीक्ष्ण बृद्धी आणि लवचीक शरीर मिळवण्यासाठी योगा देखील करतात. त्याला बास्केटबॉल आणि ट्रेकिंग खेळण्यात मज्जा येते. अक्षय नियमित स्वतःला कोणकोणत्या आऊटडोर अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेता. जसं की, जुहू बीचवर व्हॉलीबॉल खेळणं किंवा स्विमींग इत्यादी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...