Weight Loss Tips: वजन कमी करायचेय? खाण्यापिण्यात करा हे बदल

तब्येत पाणी
Updated Apr 20, 2022 | 14:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips: आयुष्यात इतर गोष्टींना महत्त्व देण्यासोबतच फिटनेस प्लानलाही आपल्या आयुष्याचा भाग बनवले पाहिजे. कारण शरीराचे वाढते वजन अनेक आजारांना निमंत्रण देणारे असते. 

weight loss
Weight Loss Tips: वजन कमी करायचेय? खाण्यापिण्यात करा हे बदल 
थोडं पण कामाचं
  • फिटनेस प्लानला बनवा रूटीनचा भाग
  • शरीराचे वाढते वजन अनेक आजारांना निमंत्रण
  • लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यात करा बदल

मुंबई: लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये(lifestyle) खूप बदल वेगाने होत आहेत. आधीच्या काळाज काम करण्यापासून ते आंघोळ, खेळणे आणि झोपण्याची कामेही वेळेत होत. त्यानुसार घरातील सदस्य काम करत आहे. मात्र आजकालच्या कोणत्याच गोष्टीची वेळ निश्चित नाही. याशिवाय लोक कोणत्याही वेळेस काहीही खात असतात ज्याचा सरळ परिणाम आपल्या शरीरावर होत असता. जेव्हा वजन अचानक वाढू लागते(weight gain) तेव्हा समस्येची माहिती मिळते. त्यानंतर मग जॉगिंग, वर्कआऊट, योगा आणि आपापल्या स्तरावर अनेक प्रयत्न सुरू होतात. change in eating habits for weight loss

अधिक वाचा - दीर्घायुष्य जगण्यासाठी हे करा!

काही लोक तर वाढलेल्या वजनाने इतके त्रस्त होतात की त्यासाठी औषधे घेण्यास सुरूवात करतात. यानेही रिझल्ट मिळत नाही आणि वाढलेल्या वजनाने आणखी टेन्शन येतो. मग तणावामुळे पुन्हा वजन वाढण्यास सुरूवात होते मात्र इतके करण्याचीही गरज नाही तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल केल्यास हे शक्य आहे. 

हेल्दी डाएट

स्वादिष्ट आहारासोबतच पौष्टिक आहाराचे सेवन करा. केवळ वर्कआऊट अथवा योगाने वजन कमी होणार नाही . यासाठी काही गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करावा जसे लो फॅट डाएट. तुमच्या डाएटमध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि प्रोटीनयुक्त हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. 

वर्कआऊट करा

जसे शरीराचे वजन वाढल्याचे संकेत मिळत असतील तर लगेचच वर्कआऊट सुरू करा. वर्कआऊट खरंतर सगळ्यांसाठीच गरजेचे आहे. दररोज सकाळी २०-२५ मिनिटे वर्कआऊट करा. यामुळे मेटाबॉलिज्मस बूस्ट होईल यामुळे वजन घटवण्यास मदत मिळेल. 

जेवण सोडू नका

शरीराचे वाढते वजन पाहून अनेकांना टेन्शन येऊ लागते. अशावेळेस काहीजण जेवण करणे सोडून देतात. मात्र तुम्ही  ही चूक करू नका. वजन कमी करण्यासाठी काही एक्सरसाईज गरजेची असतो. मात्र रिकाम्या पोटी एक्सरसाईज करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. 

अधिक वाचा - या पदार्थांचे नाश्ता करताना सेवन करू नका

गरम पाणी प्या

शरीरात मेटाबॉलिज्म सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी गरम पाणी जरूर प्या. सकाळी दोन ग्लास पाण्यात थोडासा लिंबू रस मिसळा. यामुळे शरीरात पाचनासह विषारीयुक्त पदार्थ बाहेर टाकले जातील. तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास गरम पाणी प्या. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी