Belly Fat: या कारणामुळे सुटते पोट, लगेचच बदला या ५ वाईट सवयी

तब्येत पाणी
Updated Oct 07, 2021 | 13:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या अशा काही सवयी असतात ज्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम करतात. या सवयींमुळेच पोटाची चरबी वाढते. त्यामुळेच लगेचच या सवयी बदला. 

weight loss
Belly Fat: या कारणामुळे सुटते पोट, लगेचच बदला या ५ वाईट सवयी 
थोडं पण कामाचं
  • अनेकजण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात. 
  • वजन घटवण्यासाठी दुपारचे जेवण अथवा रात्रीचे जेवण टाळल्याने मेटाबॉलिज्म धीमी होण्यास मदत होते. 
  • यामुळे फॅट वाढते. 

मुंबई: सध्याच्या युगात प्रत्येकजण बेली फॅटच्या समस्येने त्रस्त आहे. बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी वाढण्याचे कारण रिफाईंड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट असल्याचे अनेकांचे म्हणणे असते. मात्र खरंतर आपल्या अशा काही सवयी आहेत ज्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम कतात. या सवयींमुळे पोट सुटते आणि याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर होतो. जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचे आहे तर या ५ सवयी लगेचच बदला. Change this 5 habits to reduce belly fat

शुगर ड्रिंक्स

जंक फूडसोबत कोल्ड्रिंक अथवा सोड्याचे सेवन करणे हे पोटाची चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते. एका स्टडीनुसार एक ग्लास सोडा अथवा कोल्ड्रिंकमध्ये ३९ ग्रॅम साखर असते. ज्यामुळे बेली फॅट ७० टक्क्यांपर्यत वाढू शकते. 

खाण्याची वेळ आणि प्रमाण

जेवणाची योग्य वेळ आणि याचे प्रमाण यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने तसेच वेळेवर न खाल्ल्याने फॅट वाढते. एका स्टडीनुसार जर तुम्ही योग्य वेळेत ब्रेकफास्ट करता तर यामुळे डायबिटीजसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.. यााठी जेवणाचे प्रमाण योग्य ठरवावे. 

उभे राहून पाणी पिणे

उभे राहून पाणी प्यायल्याने बेली फॅट वाढते. आर्युवेदानुसार नेहमी बसून पाणी प्यायले पाहिजे. पाणी पिताना आपली कंबर एकदम सरळ ठेवा. यामुळे पाणी डोक्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि चांगल्या पद्धतीने काम करेल. 

रात्रीचे अथवा दिवसा जेवण स्किप करणे

अनेकदा लोक वजन घटवण्यासाठी एकदाच जेवतात. मात्र वजन कमी करण्यासाठी लंच अथवा डिनर स्किप करणे मेटाबॉलिज्म स्लो करण्याचे काम करते. तसेच फॅट वाढवण्याचे काम करते. यामुळे कॅलरी बर्न करण्याची क्षमता घटते आणि बेली फॅट वेगाने वाढते. 

प्रोबायोटिक्सचा रोल

प्रोबायोटिक्स पाचनक्रिया तंदुरुस्त राखतात आणि पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. जर डाएटमध्ये दह्याचा समावेश केल्यास पोट फुगणे, पाचनाशी संबंधित समस्या दूर होतात. दही खाल्ल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी