Eating Habits: रात्री उशिरा जेवताय? सकाळी नाश्ता करत नाही? तर मग सावधान!

तब्येत पाणी
Updated Apr 20, 2019 | 08:48 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Health wealth: जर तुमच्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल आणि सकाळी नाश्ताही करत नसाल तर, तुमच्या आरोग्याला धोका वाढतो.

Avoid bad eating habits
दिर्घायुष्यासाठी खाण्याच्या सवयी बदला  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • आहाराच्या सवयी बदला; निरोगी रहा
  • रात्री लवकर जेवण घ्या, सकाळी नाश्ता चुकवू नका
  • चांगल्या खाण्याच्या सवयी देतील दिर्घायुष्य

ब्राझिलिया: हल्ली प्रत्येकजण आपल्या आरोग्यासाठी जागरूक असताना दिसत आहे. पण, त्यासाठी स्वतःच्या काही सवयी बदलायच्या असतील, तर त्या बदलणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. काही जण सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या मेसेजला फॉलो करतात तर, काही जण गुगलवरून माहिती घेऊन स्वतःच्या खाण्याच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतात. पण, तुमचे आरोग्य पूर्णपणे तुमच्या खाण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. त्यामुळे थोडे इकडे लक्ष द्या. तुम्ही रात्री उशिरा जेवता? आणि सकाळी नाश्ता करत नाही? जर, तुमच्या खाण्याची सवय अशी असेल तर, तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला हृदयरोग होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात संशोधन करण्यात आल्यानंतर अशी जीवनशैली असणाऱ्यांना ती बदलण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रिवेन्टिव कार्डियोलॉजी या संस्थेच यूरोपमधील जर्नल 'द फाइंडिग्स' मध्ये यासंदर्भात एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यात आरोग्याला हानीकारक जीवनशैली असणाऱ्यांना लवकर मृत्यूला सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष सांगण्यात आला आहे. लवकर मृत्यूची शक्यता थोडी थोडकी नाही तर चार ते पाच पटीने वाढते, असे शोधनिबंधात म्हटले आहे. तसेच दुसऱ्यांदा हार्ट अटॅक येण्याची शक्यताही वाढते, असे सांगण्यात आले आहे.

शोधनिबंध काय सांगतो?

या शोधनिबंधाचे सहलेखक मार्कोस मिनीकुची हे ब्राझीलचे असून, साउ-पाउलो येथील विद्यापीठात संशोधक म्हणून काम करतात. त्यांनी काढलेल्या शोधनिबंधातील निष्कर्षाबाबत ते म्हणाले, ‘आमच्या शोधनिबंधातून असे लक्षात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला माहिती असूनही खाण्याच्या वाईट सवयी तशाच सुरू ठेवल्याचे परिणाम खूप वाईट होताना दिसतात. विशेषतः एकदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतरही या सवयी तशाच राहिल्या तर खूपच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.’ हार्ट अटॅक आलेल्या ११३ रुग्णांच्या सवयींचे निरीक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या ११३ जणांचे सरासरी वय ६० होते. त्यात ७३ टक्के पुरुष होते. संशोधनामध्ये असे लक्षात आले की, सकाळी नाश्ता न करणाऱ्यांची संख्या ५८ टक्के होती तर, रात्री उशिरा जेवण करणारे ५१ टक्के हृदयरोगी होते. तर, ४८ टक्के जणांमध्ये दोन्ही प्रकारच्या सवयी होत्या.

कसा असावा आहार?

या अभ्यासावरून मार्कोस मिनीकुची यांच्या टीमने असा सल्ला दिला आहे की, खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करण्यासाठी रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान दोन तासांचे अंतर असायलाच हवे. तर, सकाळी नाश्ता करताना त्यात दुग्ध उत्पादनांचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यात लो फॅट दूध, दही पनीर यांचा समावेश असावा. त्याचबरोबर कार्बोहाइड्रेटसही गरजेचे आहेत. त्यामध्ये गव्हाचे पदार्थ, ब्रेड तसेच फळांचाही समावेश असावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Eating Habits: रात्री उशिरा जेवताय? सकाळी नाश्ता करत नाही? तर मग सावधान! Description: Health wealth: जर तुमच्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल आणि सकाळी नाश्ताही करत नसाल तर, तुमच्या आरोग्याला धोका वाढतो.
Loading...
Loading...
Loading...