चेडॉक्स १ वॅक्सीनवर संपूर्ण जगाची नजर

तब्येत पाणी
Updated May 16, 2020 | 12:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chedox1 Covid19 Vaccine: चेडॉक्स १ या लसीकडे संपू्र्ण जगाचे लक्ष लागले आहे. या लसीवर सध्या इंग्लडमध्ये काम सुरु आहे. कोणत्याही दुष्परिणामाव्यतिरिक्त ही लस कोरोनाविरोधात उपयोगी पडू शकते.

Chedox 1 will become future Anti Corona Vaccine
प्रतिकात्मक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • चेडॉक्स १ लसीवर संपूर्ण जगाची नजर
  • कोरोनावर ठरु शकते उपयोगी
  • आतापर्यंतचे चाचणी निकाल सकारात्मक मिळाले

नवी दिल्ली: सध्या सगळे जग हे कोरोना व्हायरसमुळे हैरान झाले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. तरीही जगभरात ४४ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. सध्या या व्हायरसला नष्ट करण्यासाठी चेडॉक्स या लसीकडे सर्वांचे डोळे लागले आहे. मात्र या विषयी कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नाही. तरीही चेडॉक्सबद्दल विविध दावे केले जात आहे.        

चीनने म्हटले आहे की, आम्ही कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. जेथून हा व्हायरस जगात पसरला त्या वुहान प्रांतातील एका प्रयोगशाळेत यावर लस शोधण्यासाठी २४x७ प्रयत्न करत आहोत. जगातील इतर अनेक देश आणि आरोग्य संस्थाही कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना आणि त्यांच्या संशोधन संस्थांना या संदर्भात तात्काळ पाऊले उचलण्यास सांगितले आहे.      

चेडॉक्स १ वर सगळ्यांची नजर 

लंडनच्या एका इंन्स्टिट्यूटने दावा केला की, चेडॉक्स १ द्वारे कोरोनावर १००टक्के मात करता येऊ शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंन्स्टिट्यूटमध्ये काम करत असलेल्या वैज्ञानिकांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून चेडॉक्स १ लसीने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या लसीचे प्राण्यांवरील ट्रायलमध्ये जे परिणाम आले ते सार्वजनिक करण्यात आले आहेत.

प्राण्यांवरील ट्रायलमध्ये मोठा टप्पा पार

सुरुवातीच्या काही निकालांमधून स्पष्ट झाले आहे की, चेडॉक्स १ लस कोरोना व्हायरसचा प्रभावीपणे सामना करु  शकते. आतापर्यंतच्या चाचण्यात हे समोर आले आहे की, ही लस फुफुस्सांवर कुठलाही परिणाम न करता व्हायरसच्या प्रतिकार क्षमतेतही वाढ करत नाही. या साठी ६ माकडांना SARS-COV2 व्हायरसचे उच्चक्षमतेचे इंजेक्शन दिले.

ह्यूमन ट्रायलसाठी १००० लोकांनी केला अर्ज 

१३ मे पर्यंत जवळपास १००० लोकांनी ह्यूमन क्लिनिकल ट्रायलसाठी नाव नोंदविले आहे. जे लोक या लसीच्या निर्माण प्रक्रियेशी जोडले गेलेले नाहीत त्यांचे म्हणणे आहे की, जरी आमचे ह्यूमन ट्रायल झाले नसले तरी आत्तापर्यत या लसीचे जे परिणाम समोर येत आहेत ते अत्यंत सकारात्मक आहेत.

जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा

आजघडीला जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ही ४४ लाखांच्याही पुढे गेली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखाच्या घरात आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जगात सगळ्यात जास्त फटका हा अमेरिकेला बसला आहे. एकट्या अमेरिकेत १२ लाख लोक कोरोनाने बाधित आहेत तर ८१ हजारांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तर इकडे भारतात ८१ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ हजार पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी