मुंबई: चिकू एक स्वादिष्ट फळ असून हेल्दीही आहे. हे खाऊन आपण अनेक आजार दूर पळवू शकतो. यातील अनेक पोषकतत्वे आपले शरीर स्वस्थ राखण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज चिकूचे सेवन केले तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. चिकू शरीराच्या मांसपेशी मजबूत करण्यास मदत करतात. चिकूच्या सेवनाने कॅन्सरसारखे आजार दूर होतात. चिकू खाल्ल्याने शरीर फिट राहण्यासोबतच चेहऱ्याची सुंदरताही वाढते.
चिकूमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, आर्यन, कॅल्शियम, फायबर, अंटीऑक्सिड्ंट् असतात. ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार रोखण्यास मदत होते. जर तुम्ही दररोज चिकूचे सेवन केले तर कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
चिकूमध्ये व्हिटामिन ए मोठ्या प्रमाणत असते ज्यामुळे डोळ्यांचे तेज वाढण्यास मदत होते. दररोज चिकूचे सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात. यासाठी दररोजच्या खाण्यामध्ये चिकूचा समावेश केला पाहिजे.
चिकूमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. चिकू खाल्ल्याने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर चेहऱ्याची सुंदरताही वाढते. यातील अँटीऑक्सिडंट्स, अँटी व्हायरस आणि अँटी बॅक्टेरियल सारखे गुण त्वचेला स्वस्थ राखण्यास मदत करतात.
सध्याच्या धावपळीच्या जगात बरेचशे लोक मानसिक ताणाखाली असतात. चिकूचे सेवन दररोज केल्यास मानसिक तणाव दूर राखण्यास मदत होते. चिकू खाल्ल्याने चांगली झोप येते.
सर्दी, खोकल्या झाल्यानंतर आपल्या छातीत कफ जमा होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रासहोतो. चिकूचे सेवन केल्यास छातीत जमा झालेला कफ नाकाच्या माध्यमातून बाहेर येण्यास मदत होते.
चिकू बद्धकोष्ठतेवर रामबाण उपायाप्रमाणे काम करतात. यातील फायबर पोट साफ ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळ बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
जर तुम्ही दररोज चिकूचे सेवन केले तर या सर्व आजारांसोबत तुम्ही लठ्ठपणाही कमी करू शकता. चिकूचे सेवन वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरते.