मुलांचे वाढते वजन कमी करण्यासाठी त्यांच्या खाण्यातून वगळा 'हे' पदार्थ

childrens health know about weight loss tips for kids : मुलांचे वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी पालकांनी ठोस उपाय करणे आवश्यक आहे. 

childrens health know about weight loss tips for kids
मुलांचे वाढते वजन कमी करण्यासाठी...  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुलांचे वाढते वजन कमी करण्यासाठी त्यांच्या खाण्यातून वगळा 'हे' पदार्थ
  • मुलांमधील स्थूलत्व अनेक आजारांना आमंत्रित करू शकते
  • मुलांचे वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी पालकांनी ठोस उपाय करणे आवश्यक

childrens health know about weight loss tips for kids : लहानपणी गुटगुटीत दिसणाऱ्या बाळाचं कौतुक होतं. छान बाळसं धरलंय असं सगळे म्हणतात. पण बाळ मोठं झालं तरी त्याचं वजन सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ती चिंतेची बाब असते. मुलांमधील स्थूलत्व अनेक आजारांना आमंत्रित करू शकते. स्थूलत्वामुळे मुलांची तब्येत बिघडण्याचा धोका असतो. यामुळे मुलांचे वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी पालकांनी ठोस उपाय करणे आवश्यक आहे. 

मुलांचे वाढते वजन कमी व्हावे आणि त्यांच्यातील स्थूलत्व कमी करणे आवश्यक आहे. याकरिता मुलांच्या खाण्यातून पालकांनी निवडक पदार्थ वगळणे अत्यावश्यक आहे. हे पदार्थ वगळले तर मुलांचे वजन कमी करणे आणि आटोक्यात ठेवणे सहज शक्य होईल. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

मुलांचे वाढते वजन कमी करण्यासाठी...

  1. मुलांच्या खाण्यापिण्यातून हुशारीने मिठाई, केक, चॉकलेट, टॉफी, मैद्याचे पदार्थ वगळा. या सर्व पदार्थांमधील घटक मुलांचे वजन वेगाने वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
  2. मुलांना ताजी फळे, ताजे सकस अन्न खाण्याची सवय लावा.
  3. मुलांकडून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळून घ्या. तसेच मुलांना कराटे, मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, अॅथलेटिक्स, स्विमिंग (पोहणे) अशा स्वरुपाचे ज्यात भरपूर शारीरिक श्रम होतील ते खेळ खेळून घा. मुलांना योगासने करायला शिकवा आणि दररोज योगासने करायवा लावा.
  4. मुलांना घेऊन चालत फिरा. मुलांना एखादी पिशवी, सहज उचलणे जमेल असे थोडे सामान मुद्दाम हातात द्या आणि ते घेऊन घरी जाण्यास सांगा.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी