Long Hair | 'या' गावातील महिलांचे केस असतात ५ ते ७ फूट लांब, पाहा काय आहे कारण, कशी घेतात काळजी

World’s Longest Hair Village : केस ही प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाची बाब असते. मात्र प्रदूषण, आहार विहाराच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे केसांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. लांब केस आणि निरोगी केस राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा तर महिलांना केसांची (Women hair)गुणवत्ता सुधारण्यासाठी महागडे उपचार घ्यावे लागतात, त्यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र चीनमध्ये (China) एक ठिकाण असे आहे जिथे लांबसडक केस राखणे ही महिलांसाठी किरकोळ गोष्ट आहे.

World’s Longest Hair Village
जगातील सर्वात लांब केस असणाऱ्या महिलांचे गाव  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • चीनमधील एका गावातील महिलांच्या केसांचे अद्भूत आरोग्य
  • लांबसडक आणि घनदाट केस हे त्या गावातील महिलांचे वैशिष्ट्य
  • लांब केस ठेवण्याची आहे परंपरा

World’s Longest Hair Village : बीजिंग : प्रत्येक महिलेची इच्छा असते की तिचे केस लांब, काळे, घनदाट आणि रेशमी (Long, healthy & silky hairs) असावेत. किंबहुना केस ही प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाची बाब असते. मात्र प्रदूषण, आहार विहाराच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे केसांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. लांब केस आणि निरोगी केस राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा तर महिलांना केसांची (Women hair)गुणवत्ता सुधारण्यासाठी महागडे उपचार घ्यावे लागतात, त्यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र चीनमध्ये (China) एक ठिकाण असे आहे जिथे लांबसडक केस राखणे ही महिलांसाठी किरकोळ गोष्ट आहे. (China's huangluo yao village women have longest hairs in the world)

निरोगी, लांब आणि सुंदर केस

चीनमधील एक गाव असे आहे की जिथे लांबसडक, निरोगी आणि सुंदर केस हे तेथील महिलांसाठी नित्याचीच बाब आहे. दक्षिण चीनमधील गुइलिन शहरापासून २ तासांच्या अंतरावर असलेल्या हुआंगलुओ गाव हे आपल्या महिलांच्या लांबलचक केसांसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील महिलांचे केस ५ ते ७ फूट लांब आणि १ किलोपर्यत वजनी असतात. यामुळेच या गावाचे नाव जगातील सर्वात लांब केसांचे गाव असे गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

आयुष्यात एकदाच केस कापतात

याओ जातीच्या या महिलांना केस वाढवण्याचा छंद आहे. शिवाय लांब केस ठेवणे ही त्या गावातील एक परंपरा देखील आहे. ज्यावेळेस तरुणींचे वय १८ वर्षे असते तेव्हा या गावात एक विधी केला जातो. त्यावेळेस या तरुणींचे केस कापले जातात. या विधीचा किंवा समारंभाचा अर्थ आहे की ती तरुणी आता विवाहायोग्य झाली आहे यानंतर त्या तरुणीच्या कापलेल्या केसांना घरातील ज्येष्ठ व्यक्ती सांभाळून ठेवते. लग्नानंतर कापलेल्या केसांना एका सजवलेल्या डब्ब्यात पॅक करून नवरदेवाला भेट म्हणून दिले जाते. या समारंभानंतर ती तरुणी पुन्हा आयुष्यात आपले केस कापत नाही.

केस वाढण्यामागचे कारण

चीनमधील या गावातील महिलांची धारणा आहे की त्यांचे केस हे त्यांच्या पूर्वजांमधील आणि त्यांच्यातील संपर्काचे एक माध्यम आहे. केस वाढवून त्या आपल्या पूर्वजांना खूश करतात. आश्चर्याची बाब म्हणजे या गावातील महिलांचे केस फक्त लांब आणि घनदाटच नसतात तर वयाच्या ८० व्या वर्षाआधीपर्यत ते पांढरेदेखील होत नाहीत. या गावातील महिला लग्नाआधी आपल्या केसांना कपड्यांनी झाकून ठेवतात. लग्नानंतर त्या पुढच्या बाजूने जुडा बांधतात. आधी या महिला फक्त कुटुंबातील लोकांनाच आपले केस दाखवायच्या. मात्र १९८० पासून पर्यटकांचा वावर सुरू झाला आणि त्याचा या महिलांना मोठा फायदा झाला. केस लपवण्याची प्रथा त्यानंतर बंद झाली.
 
केंसांच्या आरोग्याचे रहस्य

चीनमधील या गावातील महिलांच्या केसांच्या आरोग्याचे रहस्य नैसर्गिक बाबींमध्ये आहे. त्या यासाठी खूप काही प्रयत्न करत नाहीत. या महिलांच्या सुंदर केसांमागे तांदळाचे पाणी आहे. ते तांदळाच्या पाण्यात चहा, फर आणि इतर जडी-बुट्या टाकून एक खास शॅम्पू बनवतात. त्यानंतर नदीच्या पाण्याने केसांना धुतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी