Clove Water Weight Loss Benefits: कमरेची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय, प्या लवंगाचे पाणी

तब्येत पाणी
Updated Feb 01, 2021 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Clove Water Benefits: लठ्ठपणा कमी करावा असे प्रत्येकाला आवडत असते. प्रत्येकाला आपली बॉडी स्लिम आणि फिट हवी असते. अशातच लवंगाचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

clove
कमरेची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय, प्या लवंगाचे पाणी 

थोडं पण कामाचं

  • लवंगामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात
  • कमरेची चरबी कमी करण्याचे काम लवंगाचे पाणी करते
  • मसाल्यांमध्ये सर्वात शक्तीशाली मसाला आहे लवंग

मुंबई: भारतात लवंगाचा(clove) वापर जेवणाला सुगंधित बनवण्यासाठी केला जातो. लवंग केवळ जेवणाची लज्जतच वाढवत नाही तर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही लवंगाचा फायदा होतो. हे सुगंधित लंग आपल्या शरीरावरील वाढलेली चरबी घटवण्याचे काम करते. लवंगामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, आर्यन,कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि सोडियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे केवळ पोटाची चरबीच कमी होत नाही तर शरीराचाही अनेक आजारांपासून बचाव होतो. जाणून घ्या लवंगाच्या वापराने कसे घटवू शकता वजन

वेगाने कमी होते वजन

लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. कमी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे आजारांचा धोका कमी होतो. लवंगामध्ये ब्लड शुगरही कंट्रोल होते. या मसाल्याला काळी मिरी, जिरे आणि दालचिनीसोबत मिसळल्यास आपल्या बॉडीचा मेटाबॉलिक रेट वेगाने वाढण्यास मदत होते. जाणून घ्या कसे बनवावे लवंगाचे पाणी...

साहित्य

५० ग्रॅम लवंग
५० ग्रॅम जिरे
५० ग्रॅम दालचिनी

कृती- सगळ्यात आधी लवंग, दालचिनी आणि जिरे भाजून घ्या जोपर्यंत यांचा सुगंध बाहेर पडतन नाही. त्यानंतर याची पावडर बनवा. ही पावडर एका एअरटाईट जारमध्ये ठेवा. 

सेवन करण्याची पद्धत

लवंग, दालचिनी आणि जिरे यांचे मिश्रण एका ग्लास पाण्यात टाकून उकळा आणि हे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर यात एक चमचा मध मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्यापोटी प्या. यासोबतच तुम्हाला हेल्दी डाएट आणि नियमित एक्सरसाईजही करणे गरजेचे आहे. यामुळेच तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी