Health Tips: नारळ पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात फलदायी पेय? जाणून घ्या त्याचे फायदे

तब्येत पाणी
Updated Apr 22, 2022 | 10:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Benefits of Coconut Water । उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करत असतात, ज्यामध्ये कूलर, पंखा, एसी अशा वस्तूंचा समावेश असतो. त्याशिवाय कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी आणि इतर अनेक पेयांचा अवलंब करत असतात.

Coconut water the most fruitful drink in summer days?
नारळ पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात फलदायी पेय?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
  • नैसर्गिकरित्या येणारे नारळ पाणी सर्व गोड पदार्थांपासून मुक्त असते.
  • अनेक सेलिब्रिटी नियमितपणे नारळाच्या पाण्याचे सेवन करताना पाहायला मिळतात.

Benefits of Coconut Water । मुंबई : उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करत असतात, ज्यामध्ये कूलर, पंखा, एसी अशा वस्तूंचा समावेश असतो. त्याशिवाय कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी आणि इतर अनेक पेयांचा अवलंब करत असतात. दरम्यान आणखी एक सर्वांचे आवडचे पेय म्हणजे नारळपाणी. नारळपाणी केवळ उष्णतेसाठी फलदायी नसून त्याचा आरोग्यासाठीही फायदा होत असतो. (Coconut water the most fruitful drink in summer days?).

नारळपाणी पिण्याचे फायदे

आरोग्य - वेबस्टोरी

नारळ पाणी हे एक स्पष्ट द्रव आहे जे नारळाच्या आत तयार होते. हिरव्या नारळात अनेकदा याचा प्रत्यय येत असतो, स्पष्ट द्रव इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत आहे. त्यामध्ये ९५ टक्के शुद्ध पाणी आहे आणि निर्जलीकरणावर उपचार करण्याचा एक निश्चित मार्ग आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये पुरुषांमधील लैंगिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी आणि लघवी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

अधिक वाचा : जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळील CISF कॅम्पवर दहशतवादी हल्ला

पोषणासाठी नारळपाणी फायदेमंद

१) पोटॅशियम
२) प्रथिने
३) व्हिटॅमिन सी
४) मॅग्नेशियम
५) फायबर
६) निरोगी चरबी

१) हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करते - नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत करते. अनेक अभ्यासांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, नारळाचे पाणी हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करते. हृदयासाठी अनुकूल पेय असूनही पूर्णपणे नारळाच्या पाण्यावर अवलंबून राहण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

२) रक्तातील साखरेचे व्यवस्थापन - नैसर्गिकरित्या येणारे नारळ पाणी सर्व गोड पदार्थांपासून मुक्त असते तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. २०१५ च्या अभ्यासानुसार, नारळाच्या पाण्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रण आणि व्यवस्थापनाशी संबंधित होते.

३) सकाळी उद्भवणाऱ्या आजारावर प्रभावी - मेडिकल न्यूज टुडेच्या मते, गरोदरपणात नारळ पाणी पिणे आई आणि बाळासाठी सारखेच फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स मॉर्निंग सिकनेस एपिसोड्स जसे की उलट्यामध्ये पोषक तत्वांचे नुकसान भरून काढण्यास मदत करू शकतात. हे कालांतराने बाळाला बळकट आणि सर्वच बाबतीत मजबूत करू शकते.

३) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - अनेक सेलिब्रिटी नियमितपणे नारळाच्या पाण्याचे सेवन करताना पाहायला मिळतात. ते हायड्रेशन आणि वजन कमी करण्यासाठी याचे सेवन करतात. शुद्ध नारळाच्या पाण्यात एका कपमध्ये फक्त ४५ कॅलरीज असतात ज्यामुळे ते साखरयुक्त पेयांपेक्षा श्रेयस्कर पर्याय बनते. खासकरून वजन कमी करण्याच्या किंवा वजन कायम ठेवण्यासाठी. नियमित पिण्याचे पाणी किंवा फळांच्या रसांच्या विरोधात नारळाच्या पाण्याचा आहारात समावेश करणे उपयुक्त आहे कारण उन्हाळ्यातील निर्जलीकरण आणि शरीरातील अतिरिक्त चरबीवर मात करण्याचा हा एक आरोग्यदायी मार्ग आहे.

४) कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवते - नारळाचे पाणी अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे जो ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव तटस्थ करण्यास मदत करतो. २०१६ च्या अभ्यासानुसार, हेच दीर्घकाळापर्यंत उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी