Kidney damage Signal : तुमच्या लघवीचा रंगच सांगतो किडणीची खरी अवस्था, ओळखा आजाराची सुरुवात

किडणीचे आरोग्य कसे आहे, याचा अंदाज लघवीच्या रंगावरून येऊ शकतो.

Kidney damage Signal
तुमच्या मूत्राचा रंगच सांगतो किडणीची खरी अवस्था  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मूत्राच्या रंगावरून समजते किडणीचे आरोग्य
  • नितळ, पिवळसर लघवी मानली जाते आरोग्याचे लक्षण
  • लघवीतून प्रोटिन बाहेर पडणे हे आजाराचे प्राथमिक लक्षण

Kidney Damage Signal : शरीरातील एक किंवा दोन्ही किडण्या खराब होणं, या अवस्थेला वैद्यकीय भाषेत किडणी फेल्युअर (Kidney failure) असं म्हटलं जातं. या अवस्थेत शरीराची अनेक बाबी करण्याची क्षमता कमी होते आणि त्याचे तब्येतीवर कायमस्वरुपी दुष्परिणाम (Side effiects) होण्याची शक्यता निर्माण होते. गंभीर अपघात किंवा जुन्या आजारांमुळे किडणीच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. जेव्हा किडण्या सक्षम आणि आरोग्यपूर्ण असतात, तेव्हा शरीरातील खनिज पदार्थ, अनावश्यक घटक वेगळे करून रक्त शुद्ध (Blood purification) राखण्याचं काम होत असतं. मात्र किडणीची क्षमता जसजशी कमी होत जाईल, तसतसे आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ लागतात. यामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचा रंग (Colour of urine) बदलण्याची शक्यता असते. 

लक्षणं दिसत नाहीत

किडणीच्या आजाराची प्राथमिक लक्षणं दिसत नसल्याचं सांगितलं जातं. मूत्राचा रंग बदलण्याची इतरही अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यापैकी एक कारण किडणीशी संबंधित असू शकतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मूत्राचा रंग बदलल्याचं दिसेल, तेव्हा तेव्हा किडणीची टेस्ट करून खातरजमा कऱणं आवश्यक आहे. 

१. स्वच्छ किंवा हलका पिवळा

मूत्राचा रंग नितळ किंवा हलकासा पिवळा असेल तर तुमचं आरोग्य चांगलं असल्याचं लक्षण मानलं जातं. तुम्ही पुरेसं पाणी पित आहात आणि हायड्रेटेड आहात, असा त्याचा अर्थ होतो. तुमची किडणी सुदृढ असल्याचं हे लक्षण मानलं जातं.

२. गडद पिवळा

जर तुमच्या मूत्राचा रंग गडद पिवळा असेल, तर तुमच्या शरीरात जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. तुम्हाला पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. पाणी न पिल्याचा वाईट परिणाम किडण्यांवर होण्याची शक्यता असते.

अधिक वाचा - Dry Eyes Care : कोरड्या डोळ्यांची समस्या आहे का? हे 5 पदार्थ दूर करतील समस्या

३. गुलाबी लालसर

मूत्राचा रंग गुलाबी लालसर असण्यामागे दोन कारणं असू शकतात. एकतर आहारात जर तुम्ही कुठलं फळ खाल्लं असेल, तर त्याचा तो परिणाम असू शकतो. दुसरं कारण म्हणजे मूत्रात रक्त मिसळत असल्यामुळेही हे घडू शकतं. यापैकी नेमकं काय कारण आहे हे समजण्यासाठी रक्ताची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

४. नीळा रंग

जर तुम्ही कृत्रिम रंग असणारे पदार्थ खाल्ले असतील तर ते मूत्राद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे अनेकदा हेच कारण असल्याचं दिसतं.

अधिक वाचा - Heart Attack Risk Factors: आजपासूनच या 3 वाईट सवयी टाळा, नाहीतर येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

५. फेसाळ

जर तुमची लघवी फेसाळ होत असेल तर मूत्रावाटे अतिरिक्त प्रोटिन बाहेर फेकलं जात असल्याचं हे लक्षण समजलं जातं. लघवीत प्रोटिन आढळणं हे किडणीच्या गंभीर आजाराचं प्राथमिक लक्षण आहे. असा प्रकार घडला तर किडणीच्या डॉक्टरांकडे जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी.

डिस्क्लेमर - ही सर्व किडणीच्या आरोग्याबाबतची काही सामान्य लक्षणं आहेत. तुम्हाला किडणीबाबत किंवा इतर आरोग्यासंबंधी कुठळीही गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी