Hair Fall Desi Remedies:सतत केस गळणं त्रासाचे कारण बनलंय? मग हे घरगुती उपाय येतील कामी

तब्येत पाणी
Updated Jan 31, 2023 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hair Fall Desi Remedies in Marathi :केसांशी संबंधित सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक समस्या म्हणजे केस गळणे. असे खूप लोकं आहेत जे केस गळण्याच्या समस्येला त्रासले आहेत. एकीकडे स्त्रिया केस गळायला लागले की काळजी घेतात आणि दुसरीकडे पुरूष अर्धे केस गळल्यानंतर केस कमी झाल्याचा ताण घेऊ लागतात.

If constant hair loss is causing trouble, then these home remedies will come in handy
सतत केस गळणं त्रासाचे कारण बनलंय? मग हे घरगुती उपाय करा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केसांशी संबंधित सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक समस्या म्हणजे केस गळणे.
  • एक मेथी दाण्यापासून देशी उपाय करता येतो.
  • कांद्याचा रस डोक्याला लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

Hair Fall Desi Remedies in Marathi: केसांशी संबंधित सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक समस्या म्हणजे केस गळणे. असे खूप लोकं आहेत जे केस गळण्याच्या समस्येला त्रासले आहेत. केस गळायला लागले की स्त्रियांची चिंता खूप वाढत असते. पण पुरुषांविषयी तसं नाही.अर्धे केस गळले तेव्हा कुठे ते केस गळतीचं ताण घेऊ लागतात. पण केस गळण्याची समस्या मात्र दोघांना असते. केस गळू लागले म्हणून सर्वजण चिंतेत असतात. (Constant hair loss is causing trouble, then these home remedies )

केस गळणं थांबवावं यासाठी अनेकण विविध उपाय करततात. परंतु त्याचा प्रभाव होत नाही. बहुतेकांचा तर बाजारातील शॅम्पू आणि औषधांवर खर्च करून पैसा व्यर्थ जात असतो. यामुळे चिंता दुप्पटीने वाढत असते. पण वाचक मित्रांनो काळजी नको आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही केस गळणं थांबवू शकतात. या उपयामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळते आणि मजबूतही होतात. चला तर जाणून घेऊया या  देसी (देसी नुस्खे), आयुर्वेदिक उपचारांबद्दल . 

मेथी दाणे

एक कप मेथीच्या दाण्यापासून देशी उपाय करता येतो. हे दाणे कूपांची दुरुस्ती करतात आणि केसांच्या वाढीस (Hair Growth) मदत करतात. याशिवाय यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अ‍ॅसिड केसांना मजबूत करतात. ही रेसिपी वापरण्यासाठी एक कप मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बारीक करून पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट केसांना हेअर मास्कप्रमाणे लावा आणि 30 ते 40 मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवून काढा. ही क्रिया आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करून बघा, केस गळतीवर नक्कीच फरक जाणवेल. 

अधिक वाचाEgg : अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका

कांद्याचा रस 

कांदा जवळपास सगळळ्यांचा घरी मिळतो. कांद्याचा रस डोक्याला लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. केस गळणे थांबते आणि टाळूच्या समस्याही दूर होतात. कांद्याचा रस बनविण्यासाठी एका भांड्यात कांदा घ्या आणि तो  किसून घ्या. यातून रस काढा.  हा रस बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांमध्ये लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. उरलेला रस केसांच्या टोकांना लावा. कांद्याचा रस  अर्धा तास केसांना लावून ठेवा, त्यानंतर केस धुवा.

अंड्याचा हेअरमास्क 

अंड्यांमध्ये फक्त प्रोटीन नाही तर फॉस्फरस, जिंक आणि सल्फरसारखे पोषक घटक देखील असतात. यामुळे एग हेअर मास्क केस वाढविण्याचे काम करते.  तसेच केस मजबूत करून ते गळती थांबवत असतात. केसांवर अंड्याचा हेअर मास्क लावण्यासाठी एका भांड्यात एक अंडे फोडून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. तुम्ही त्यात खोबरेल तेलही घालू शकता. 20 ते 25 मिनिटे केसांमध्ये ठेवल्यानंतर हा मास्क धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावता येतो.

आवळा 

व्हिटॅमिन-सीने भरपूर आवळा केसांची वेगाने वाढ होणे आणि केसांचे गळणे थांबवण्यासाठी ओळखले जाते. यामुळे त्याचा वापर खूप फायदेशीर ठरतो. एका भांड्यात एक चमचा आवळा पावडर घ्या आणि पाण्यासोबत त्याची पेस्ट तयार करा. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकता येतील. ही पेस्ट केसांना लावून 35 ते 40 मिनिटे ठेवा आणि नंतर डोके धुवून केस स्वच्छ करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी