स्पर्म काऊंट वाढवतं जायफळ, 'या' आजारांपासूनही मिळते मुक्ती

Benefits Of Nutmeg: जायफळ हे खाण्यात स्वाद आणि सुंगध तर देतंच पण हे आरोग्यदायी देखील आगे. अपचन, गॅस, शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासोबत निद्रानाश दूर करणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

consuming nutmeg daily for increase sperm count 
स्पर्म काऊंट वाढवतं जायफळ, 'या' आजारांपासूनही मिळते मुक्ती  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जायफळाच्या सेवनाने सांध्यातील वेदना कमी होतात 
  • शुक्राणू वाढीसाठी जायफळ हे जालीम औषध आहे
  • जायफळ हे पेन किलरचं देखील काम करतं. 

मुंबई: गरम मसाल्यांमध्ये जायफळला फार महत्त्व आहे. कारण की, जायफळ खाद्यपदार्थांचा सुगंध बऱ्याच प्रमाणात वाढवतो. ज्याप्रमाणे जायफळ खाण्याची चव वाढवतं तसंच अनेक रोगांवर देखील गुणकारी आहे. जायफळ हे एका प्राकृतिक औषध आहे. जे एकप्रकारे पेन किलरचं काम करतं. 

जायफळ आरोग्यदायी असलं तरी त्याचं जास्त सेवक करता कामा नये. कारण यामुळे पचन, डायरिया आणि वांतीची याची समस्या उद्भवू शकते. चिमूटभर जायफळ हे पुरेसं असतं. कारण तेवढंच जायफळ हे अनेक समस्यांचा इलाज करु शकतं. 

ल्यूकेमियाने पीडित लोकांसाठी जायफळ हे खूपच फायदेशीर आहे. कुकीज आणि केक यासारख्या डेझर्टचा स्वाद वाढविण्यासाठी या सुंगधी मसाल्याचा वापर होतो. जे खूपच औषधी आहे. जायफळाचं तेल देखील असतं. जायफळाची पावडर तयार करुन ठेवल्यास त्याच्यातील औषधी गुण हे कमी होतात आणि सुंगध देखील कमी होतो. 

  1. शुक्राणू वाढतात: ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असते त्यांनी जायफळाचं नक्की सेवन करावं. यामुळे त्यांच्या वीर्यात शुक्राणूंची मात्रा वाढते. यामुळे इनफर्टिलिटीची समस्या दूर होते. जायफळाचं सेवन त्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरतं ज्यांना सेक्समध्ये जास्त रुची नसते. 
  2. ब्रेन टॉनिकप्रमाणे करतं काम: जायफळ हे ब्रेन टॉनिकप्रमाणे काम करंत. यामुळे मेंदू अधिक जलद होतो. तसंच थकवा आणि तणाव दूर करण्यात देखील खूप फायदेशीर मानलं जातं. लहान मुलांना दूधामध्ये जायफळ किसून दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल 
  3. जायफळ हे वेदना निवारक आहे: जायफळ हे एखाद्या पेन किलरसारखं काम करतं. चीनमध्ये हे प्राचीन काळापासून औषधाच्या स्वरुपात वापरलं जातं. सांध्यातील वेदना, स्नायूंमधील वेदनाच कमी करत नाही तर संधिवातासारख्या वेदनांमध्ये देखील जायफळ हे खूपच प्रभावी आहे.
  4. पोटाच्या समस्याही दूर करतं: जायफळ हे खूपच औषधी आहे. ते पोटाच्या अनेक विकारावर फायदेशीर आहे. अपचन, डायरिया यासारख्या अनेक व्याधींवर हे गुणकारी ठरतं. जायफळच्या सेवनाने गॅसेसची समस्या देखील दूर होते. 

डिस्क्लेमर: वरील लेखामध्ये दिलेल्या टिप्स ही सामान्य माहितीच्या आधारे दिल्या गेल्या आहेत. याचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी