Benefits Of Asafoetida : हिंगाचे सेवन पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर; हे आहेत हिंगाचे प्रमुख ५ फायदे

तब्येत पाणी
Updated Jan 09, 2022 | 12:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Benefits Of Asafoetida | : हिंगाचा उपयोग जवळपास सर्वच घरांमध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाक घरात हिंगाचा उपयोग मसाला म्हणून केला जातो. मात्र पूर्वीच्या काळापासून हिंगाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. लक्षणीय बाब म्हणजे हिंगाच्या वापरामुळे अन्नाचा स्वाद वाढतोच त्यासोबतच पुरूषांसाठी हिंगाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Consumption of asafoetida is very beneficial for men Here are 5 major benefits of asafoetida
हिंगाचे सेवन पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंगाचा उपयोग जवळपास सर्वच घरांमध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
  • पुरूषांसाठी हिंग एक प्रभावी औषध म्हणून काम करते. हिंगाच्या सेवनाने पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या गंभीर समस्या दूर होतात.
  • रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने डायबिटीजच्या समस्येचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे या समस्येवर देखील हिंगाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. दरम्यान नियमितपणे हिंगाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीला कमी केले जाऊ शकते.

Benefits Of Asafoetida | नवी दिल्ली : हिंगाचा उपयोग जवळपास सर्वच घरांमध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाक घरात हिंगाचा (Asafoetida/Perungayam) उपयोग मसाला म्हणून केला जातो. मात्र पूर्वीच्या काळापासून हिंगाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. लक्षणीय बाब म्हणजे हिंगाच्या वापरामुळे अन्नाचा स्वाद वाढतोच त्यासोबतच पुरूषांसाठी हिंगाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. पुरूषांसाठी हिंगाच्या सेवनाचे फायदे अनेक आहेत आणि याचे नियमित सेवन केल्याने कित्येक समस्यांवर आराम देखील मिळतो. पुरूषांसाठी हिंग एक प्रभावी औषध म्हणून काम करते. हिंगाच्या सेवनाने पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या (Erectile Dysfunction) गंभीर समस्या दूर होतात. (Consumption of asafoetida is very beneficial for men Here are 5 major benefits of asafoetida). 

पुरूषांसाठी हिंगाचे फायदे (Benefits Of Asafoetida For Men)

हिंगामध्ये शरीरासाठी फायदेमंद पुरूषांसाठीअसलेले कित्येक गुण आहेत. हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे अनेक रोग आणि समस्यांवर फायदेशीर मानले जातात. बऱ्याचदा संतुलित प्रमाणात हिंग खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.दरम्यान हिंगाचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. याचे सेवन अन्नासोबत करण्याबरोबर रोज पाण्याद्वारे देखील करू शकतो.  

इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर फायदेशीर

पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या अनेक कारणांमुळे असू शकते. त्यामुळे या समस्येमध्ये हिंगाचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर मात करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगच्या पाण्याचे सेवन केले जाऊ शकते किंवा जेवणात देखील हिंग वापरले जाऊ शकते. 

गर्भधारणेच्या (infertility) समस्येवर फायदेमंद

आजच्या घडीला पुरुषांमध्ये वंध्यत्वाची म्हणजेच गर्भधारणेची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. तज्ञांच्या मते यामागे अनेक कारणे असू शकतात. खाण्यापिण्याची समस्या, राहणीमान, धुम्रपान आणि मद्यपान यांमुळेही पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. वंध्यत्वाच्या या समस्येवर मात करण्यासाठी हिंगाचा रोज वापर करणे फायदेशीर ठरते.

रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) कमी करण्यासाठी फायदेशीर 

ब्लड शुगरची समस्या खाण्यावर नसलेले नियंत्रण आणि चुकीचे राहणीमान या कारणांमुळे उदभवते. लक्षणीय बाब म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने डायबिटीजच्या समस्येचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे या समस्येवर देखील हिंगाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो. दरम्यान नियमितपणे हिंगाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीला कमी केले जाऊ शकते. 

पुरूषांची ताकद वाढवण्यास हिंग फायदेशीर 

हिंगाचा वापर सामान्यत: मसाल्याच्या रूपात खाण्याचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे हिंग अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून वापरले जाऊ शकते. पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी हिंगाचे सेवन खूप उपयुक्त आहे. यासाठी रोज एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग पावडर किंवा ओली हिंग मिसळून त्याचे नियमित सेवन करावे. तर हवे असल्यास हिंगासोबत आले पावडरही वापरली जाऊ शकते. 

कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी हिंग फायदेशीर 

कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या समस्येवरही हिंगाचे सेवन खूप फायदेशीर आहे. हिंगाचे नियमित सेवन केल्याने शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. हिंगामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे काम करतात. मात्र ते घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी