How to boost Good Cholesterol: रक्तवाहिन्या ब्लॉक करणाऱ्या खराब कोलेस्टेरॉलपासून आता होईल सुटका; या गोष्टी वाढवतात चांगले कोलेस्टेरॉल 

तब्येत पाणी
Updated Jun 16, 2022 | 10:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips to increase your HDL cholesterol । कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. जकाल बरेच लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत, ज्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे.

Consumption of these 5 things increase good cholesterol
या ५ गोष्टी वाढवतात चांगले कोलेस्टेरॉल, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे.
  • बरेच लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत.
  • एक वाईट कोलेस्टेरॉल आहे ज्याला एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणतात.

Tips to increase your HDL cholesterol । मुंबई : कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. आजकाल बरेच लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत, ज्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे. खर तर शरीरातील निरोगी पेशींसाठी कोलेस्टेरॉल आवश्यक असते. त्यामध्ये चांगले कोलेस्टेरॉल एक असते ज्याला HDL Cholesterol या नावाने ओळखले जाते. (Consumption of these 5 things increase good cholesterol). 

खराब कोलेस्टेरॉल म्हणजे धोक्याची घंटा

एक वाईट कोलेस्टेरॉल आहे ज्याला एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणतात. शरीरात त्याची पातळी वाढणे ही एक धोक्याची घंटा आहे कारण ती वाढल्याने हृदयविकार, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे कोलेस्टेरॉल शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे कारण ते खराब कोलेस्टेरॉल शोषून घेते आणि ते यकृताकडे परत नेते, जे नंतर ते शरीरातून काढून टाकते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर तुम्ही चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्याचा विचार केला पाहिजे. शरीरातील चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. 

या ४ गोष्टी वाढवतात चांगले कोलेस्टेरॉल 

  1. आहारात निरोगी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा - चांगल्या कोलेस्टेरॉलसाठी तुम्ही तुमच्या आहारात निरोगी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बिया, फॅटी फिश, मोहरीचे तेल, ऑलिव्ह, एवोकॅडो यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. या गोष्टी शरीराला चांगली चरबी देतात, जी हानिकारक नसते.
  2. रोज एक्सरसाइज करा - दररोज व्यायाम केल्याने शरीरात साठलेले वाईट कोलेस्टेरॉल तर कमी होतेच पण शरीरासाठी त्याचे अनेक फायदेही होतात. पोषणतज्ञांच्या मते, एरोबिक व्यायाम, उच्च-तीव्रता वर्कआउट्स आणि ताकद प्रशिक्षण देखील एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करते.
  3. जांभळी फळे आणि भाज्या खा - तुमच्या आहारात जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्यांचा समावेश करा कारण त्यात अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करतात.
  4. ट्रान्स फॅटचे सेवन टाळा - ट्रान्स फॅट खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल कमी करते. लक्षणीय बाब म्हणजे ट्रान्स फॅटने समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित विकारांचा धोका देखील वाढतो.

खराब कोलेस्टेरॉल कसे कमी करावे? 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी