Computer Vision Syndrome: कॉम्प्युटरमुळे तुम्ही 'या' मोठ्या आजाराला बळी तर पडत नाही ना?

What Is Computer Vision Syndrome: डोळ्यांच्या समस्या आजकाल अनेकांना जाणवू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्क्रीनवर जास्त काम करणे. काही जण आता कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाच्या आजाराची शिकार बनत असल्याचं समोर येत आहे..

continuous working on computer are you falling prey to big disease computer vision syndrome
कॉम्प्युटरमुळे तुम्ही या मोठ्या आजाराला बळी तर पडत नाही ना?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दररोज अनेक तास कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम केल्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात.
  • ही समस्या इतकी गंभीर बनते की माणूस त्याची कल्पनाही करू शकत नाही.
  • अशा स्थितीत ती व्यक्ती हळूहळू कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाच्या धोकादायक आजाराची शिकार बनते.

Computer Vision Syndrome Symptoms: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर कामाचा दबाव जास्त असतो. दिवसभर कॉम्प्युटर (computer) आणि लॅपटॉपवर (Laptop) त्यांना काम करावं लागतं. दररोज अनेक तास कॉम्प्युटर लॅपटॉपवर काम केल्यामुळे डोळ्यांमध्ये (eyes) अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि ही समस्या इतकी गंभीर बनते की माणसाला त्याचा अंदाजही येत नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती हळूहळू कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाच्या धोकादायक आजाराला बळी पडते. (continuous working on computer are you falling prey to big disease computer vision syndrome)

हा आजार जास्त वेळ कॉम्प्युटर, टेलिव्हिजन, मोबाइल पाहणाऱ्या लोकांना होतो. त्यामुळे डोळ्यांवर खूप दबाव येतो. त्यामुळे डोळे थकल्यासारखे होतात. केवळ नोकरदारच नाही तर आजकाल तरुणांमध्येही ही समस्या अधिक दिसून येत आहे. या आजाराची लक्षणे कोणती आहेत आणि एखादी व्यक्ती या आजाराची शिकार कशी होत आहे हे आपण जाणून घेऊया.

अधिक वाचा: Knee Health: गुडघे खराब होऊ लागल्याची ही आहेत लक्षणं, वेळीच ओळखा आणि उपाय करा

ही आहेत कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची लक्षणे

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची सुरुवात ही डोळे कोरडे होणं यापासून होते. माणसाला वारंवार असे वाटते की त्याच्या डोळ्यात धूळ, घाण गेली आहे. याशिवाय काही लोक स्क्रीन किंवा टीव्हीकडे पाहताना डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करायला विसरतात. त्यामुळे डोळ्यात पाणी येऊ लागते. डोळ्यांत जळजळ होऊन डोळे लाल होतात. अस्पष्ट दिसू लागतं. या आजारामुळे पाठ आणि मानेतही वेदना जाणवू लागतात.

अधिक वाचा: Tamarind Leaves for hair: केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी करा चिंचेचा वापर, अशी आहे पद्धत

अशा प्रकारे टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम टाळण्यासाठी, टीव्ही, लॅपटॉप स्क्रीन पाहताना चष्मा घालणे आवश्यक आहे. याशिवाय कॉम्प्युटरवर काम करताना थोडा-थोडा वेळ ब्रेक घ्या. कोणत्याही स्क्रीनकडे जास्त बारकाईने पाहू नका. कॉम्प्युटरची स्क्रीन आणि डोळे यामध्ये किमान 18 ते 30 इंच अंतर असावे. याशिवाय कॉम्प्युटरवर काम करताना एकाच अवस्थेत बसू नका. मधेच बसण्याची मुद्रा बदलत रहा. काम करताना डोळे मिचकावायला विसरू नका. मधेच डोळ्यांचे व्यायाम करत रहा. जेणेकरुन तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि तुमच्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी राहिल.

(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी