Control Thyroid With Ayurvedic Remedies : थायरॉइडची समस्या हल्ली अनेकांना जाणवू लागली आहे. एका अभ्यासानुसार भारतातील ४० टक्के महिलांना थायरॉइडची समस्या त्रास देऊ लागली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉइडच्या समस्येची तीव्रता जास्त आहे. तणाव, शरीरातील आयोडिनची कमतरता, स्ट्राँग औषधांचा शरीरावर होणारा मारा, वाढते स्थूलत्व यामुळे थायरॉइडची समस्या अनेकांना जाणवू लागली आहे.
थायरॉइडच्या समस्येवर औषधांनी उपचार करणे शक्य आहे. पण काही वेळा एका औषधामुळे दुसरा त्रास सुरू झाल्याची उदाहरणे आहे. काही जणांच्या बाबतीत हे घडते. यामुळे औषधाच दुष्परिणाम नियंत्रित करण्यासाठी पुन्हा एखादे नवे औषध द्यावे लागते. हा धोका टाळण्यासाठी थायरॉइडच्या समस्येवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण या पर्यायाची निवड करण्याआधी संबंधित व्यक्तीने त्याच्या किंवा तिच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे.