Corona : तुम्हाला आधी कोरोना झालाय? लसीकरण करुनही दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोनाची लागण, संसर्ग न होण्यासाठी करा हे उपाय

देशातच नाही तर जगभरात कोरोना (Corona) कहर माजवला आहे. लाखो लोकांचा जीव या कोरोना आजाराने घेतला आहे. कोरोनाच्या दोन लहरी गेल्यानंतर आता कुठे कोरोना संक्रमित (Corona infected) होण्याचा आकडा कमी झालेला दिसतो. परंतु अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली असल्याचं  आपण पाहत आहोत. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये भारताच्या आरोग्य खात्याने (Department of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात तब्बल 10,256 नवीन कोविड केसेस समोर आल्या आहेत.

 How dangerous is it to be corona positive for the second time
दुस-यांदा कोरोना पॉझिटिव्ह होणं किती आहे खतरनाक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आजवर एकूण 4 कोटी 37 लाख 913 लोक कोरोनातून ठीक झाले आहेत.
  • देशात तब्बल 10,256 नवीन कोविड केसेस समोर आल्या आहेत.
  • दुस-यांदा किंवा दोनदा कोविडचे संक्रमण होणे खूप घातक गोष्ट आहे.

मुंबई :  देशातच नाही तर जगभरात कोरोना (Corona) कहर माजवला आहे. लाखो लोकांचा जीव या कोरोना आजाराने घेतला आहे. कोरोनाच्या दोन लहरी गेल्यानंतर आता कुठे कोरोना संक्रमित (Corona infected) होण्याचा आकडा कमी झालेला दिसतो. परंतु अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली असल्याचं  आपण पाहत आहोत. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये भारताच्या आरोग्य खात्याने (Department of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात तब्बल 10,256 नवीन कोविड केसेस समोर आल्या आहेत. देशभरात आजवर एकूण 4 कोटी 37 लाख 913 लोक ठीक झाले आहेत. पण एकूण 5 लाख 27 हजार 556 लोकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. दरम्यान अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत आहे, यामुळे दुसऱ्यांदा कोरोना होणं किती धोकादायक असतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

लसीकरणानंतर सुद्धा कोविड होऊ शकतो का?

WebMd च्या एका रिपोर्टनुसार, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा कोरोना होऊ शकतो. मग भले तुम्ही लसीकरण घेतले असेल तरी त्याचा उपयोग नाही. तुम्हाला दोनवेळा किंवा जास्त वेळा कोरोना होऊ शकतो. याचे अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे जी लस तुम्ही घेतलेली असते तिने तुमच्या शरीरात प्रभाव दाखवलेला नसतो. म्हणूनच पुन्हा-पुन्हा कोरोना होऊ नये यासाठी सध्या बुस्टर डोस घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Read Also : काँग्रेस पक्षात ट्विट आणि चापलुसी करणाऱ्यांना अच्छे दिन

दुस-यांदा कोविड होणं किती धोकादायक?

दुस-यांदा किंवा दोनदा कोविडचे संक्रमण होणे खूप घातक गोष्ट आहे. कारण पहिल्या संक्रमणावेळीच या विषाणूने तुमच्या शरीराला आणि आतील रोगप्रतिकारक शक्तीला खूप नुकसान पोहोचवलेले असते. जर दोनदा कोरोना झाला तर त्याचे सर्वात जास्त गंभीर परिणाम हे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांना आणि वृद्धांना सर्वाधिक जास्त भोगावे लागू शकतात. म्हणूनच अशा व्यक्तींनी आजही स्वत:ची अधिकाधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Read Also : तिन्ही फॉर्मेटमध्ये 100सामने खेळणारा विराट पहिला भारतीय

आहारावर द्या लक्ष 

यावर उपाय म्हणजे चांगला आहार घ्या. या स्थितीमध्ये लो कार्ब डाएट घ्या कारण यामुळे हाय ब्लड शुगर आणि प्रेशर कंट्रोल करण्यात मदत मिळते. शिवाय नियमित रूपाने बीटा कॅरोटीन, एस्कॉर्बिक अॅसिड आणि अन्य आवश्यक व्हिटॅमिनने समृद्ध असणाऱ्या भाज्या आणि फळे यांचे सेवन करा. काही खाद्यपदार्थ जसे की मशरूम, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरव्या भाज्या जसे की ब्रोकोली, पालक खाल्ल्याने फायदा मिळू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी