COVID 19: श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोरोना रुग्णांनी घ्यावी ही काळजी, या गोष्टींपासून राहावे दूर

कोरोनाचा SARS-CoV-2 प्रकारचा विषाणू हा इतर सहा कोरोना विषाणूंसारखाच व्यक्ती व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. हा संसर्ग सौम्य ते घातक असा असू शकतो. यात श्वसनमार्गावर प्रामुख्याने आक्रमण होते.

Breathing issues
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोरोना रुग्णांनी घ्यावी ही काळजी, या गोष्टींपासून राहावे दूर  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

 • कोरोनाच्या गुंतागुंतीमुळे होत आहेत मृत्यू
 • ही लक्षणे दिसत असल्यास लगेच घ्या वैद्यकीय सल्ला
 • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास करा हे उपाय

कोरोनाचा (Corona) SARS-CoV-2 प्रकारचा विषाणू (virus) हा इतर सहा कोरोना विषाणूंसारखाच (corona virus) व्यक्ती व्यक्तीच्या संपर्कात (person to person contact) आल्यामुळे पसरतो. हा संसर्ग सौम्य (mild) ते घातक (dangerous) असा असू शकतो. यात मध्यपूर्व श्वसन सिंड्रोम आणि अचानक तीव्र श्वसन सिंड्रोम असे गंभीर रोग सामील आहेत. इतर प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे बहुतेकदा सर्दी (cold) होते जी वर्षभर असर सोडू शकते. ज्या लोकांची तब्येत (health) चांगली आहे अशा लोकांसाठी हे धोकादायक नाही.

कोरोनाच्या गुंतागुंतीमुळे होत आहेत मृत्यू

कोरोनाच्या विषाणूमुळे न्यूमोनिया, श्वसनमार्ग बंद होणे, हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, सेप्टिक शॉकमुळे मृत्यू होऊ शकतो. कोव्हिडच्या आजारातील गुंतागुंत ही सायटोकिन रिलीज सिंड्रोम किंवा सायटोकिन स्टॉर्म या नावाने ओळखले जाते.

ही लक्षणे दिसत असल्यास लगेच घ्या वैद्यकीय सल्ला

 • श्वास घेण्यास त्रास किंवा कमी श्वास
 • छातीत वेदना किंवा दबाव वाढणे
 • भ्रमिष्टपणा
 • पूर्णपणे जाग न येणे
 • ओठ किंवा चेहऱ्यावर निळसरपणा
 • ताप
 • खोकला
 • थकवा
 • थंडी वाजणे
 • अंगदुखी
 • डोकेदुखी
 • घशात खवखव
 • नाक चोंदणे किंवा वाहते नाक
 • चव किंवा वास न येणे
 • मळमळ
 • जुलाब

श्वास घेण्यास त्रास होत असल्यास करा हे उपाय

 • कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की श्वास घेताना त्रास जाणवल्यास सर्वांनाच रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. जर ऑक्सीमीटरवर ऑक्सिजनची पातळी 90च्या खाली आली तरच रुग्णालयात यावे. याशिवाय अशा लोकांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
 • डब्ल्यूईबीएमडीच्या एका अहवालानुसार शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास गॅसस्टोव्ह, मेणबत्ती, फायरप्लेस किंवा गॅसहीटर अशा गोष्टींपासून कमीत कमी 5 फूट दूर राहावे. यामुळे आपल्याला आणखी त्रास होण्याची शक्यता आहे.
 • पेंट थिनर, एरयोसेल स्प्रे, क्लीनिंग फ्लूइड अशा अग्निजन्य पदार्थांचा वापर अजिबात करू नका. तसेच पेट्रोलियम जेली, तेल, ग्रीस बेस्ड क्रीम किंवा व्हॅसलीन अशा गोष्टीही छाती किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर लावू नका.
 • श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चुकूनही धूम्रपान करू नका. सिगरेट किंवा विडी पिणाऱ्यांपासूनही लांबच राहा. घरात वापरल्या जाणाऱ्या सुगंधी अगरबत्त्या किंवा धूपापासूनही लांब राहा.
 • घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. बाहेर किंवा बाल्कनीत झाडे लावा जेणेकरून घरातील नायट्रोजन बाहेर जाऊन ऑक्सिजन मिळत राहील.
 • पुरेशा प्रमाणात पाणी प्या, ज्यामुळे आपल्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता होणार नाही. रोज योगा आणि प्राणायाम करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी