Corona Report: देशात एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा आणखी एक विक्रम

Corona Report: देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. भारतात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा प्रमाण आता ७० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • भारतात कोरोमुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ 
  • गेल्या २४ तासांत ५७,३८१ रुग्ण बरे होऊन घरी
  • देशातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत रुग्ण बरे होण्याचा प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतालाही विळखा घातला होता. मात्र, आता भारतातील कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत आहे. कारण, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Covid19 Patient Discharge and Recovery Rate) आता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ५७,३८१ रुग्ण बरे झाल्याने भारतात एका दिवसात रुग्ण बरे होण्याच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. देशातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत रुग्ण बरे होण्याचा प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे तर संपूर्ण देशातील कोोरना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक झाले आहे. 

देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही २५,२६,१९२ इतकी आहे. यापैकी १८,०८,९३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४९,०३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात सध्याच्या स्थितीत ६,६८,२२० इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे खूपच जास्त आहे. 

भारताच्या ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात एकूण ८,६८,६७९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची एकूण संख्या ही २.८५ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नसून शासनाने लागू केलेले नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच मास्क परिधान करणे, सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य आहे.

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 1130 39  1032 108  24
2 Andhra Pradesh 89907 873  180703 9719  2475 97 
3 Arunachal Pradesh 852 62  1750 32  5
4 Assam 22633 390  51693 2310  175
5 Bihar 32636 1153  64930 2646  442 16 
6 Chandigarh 809 70  1091 15  28
7 Chhattisgarh 4494 329  9857 199  130 16 
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 464 1331 39  2  
9 Delhi 11366 391  135108 790  4178 11 
10 Goa 3720 229  7157 245  93
11 Gujarat 14196 14  59538 1071  2746 15 
12 Haryana 6748 72  38348 862  518
13 Himachal Pradesh 1304 58  2551 116  19  
14 Jammu and Kashmir 7027 111  19942 640  520 11 
15 Jharkhand 7856 28  13515 671  224 15 
16 Karnataka 79209 864  128182 6940  3717 104 
17 Kerala 14146 255  26992 1304  139 10 
18 Ladakh 567 1303 21  9  
19 Madhya Pradesh 9928 210  32405 570  1081 16 
20 Maharashtra 151865 1760  401442 10484  19427 364 
21 Manipur 1825 21  2360 65  13  
22 Meghalaya 641 581 34  6  
23 Mizoram 309 348 0  
24 Nagaland 2116 95  1198 59  8  
25 Odisha 15100 662  39206 1305  324 10 
26 Puducherry 2880 130  4009 181  106
27 Punjab 9954 563  18328 489  731 25 
28 Rajasthan 13949 813  43897 2078  846 13 
29 Sikkim 456 107  623 42  1  
30 Tamil Nadu 53716 217  267015 5556  5514 117 
31 Telengana 23379 59  66196 1912  684 10 
32 Tripura 1796 90  5088 73  50
33 Uttarakhand 3966 179  7502 488  147
34 Uttar Pradesh 50426 717  92526 3740  2335 55 
35 West Bengal 26850 403  81189 2572  2319 60 
Total# 668220 6625  1808936 57381  49036 996 

राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे

राज्यात शुक्रवारी (१४ ऑगस्ट २०२०) १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के  एवढे आहे. सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी