कोरोना लस: भारत बायोटेक करणार 'कोव्हॅक्सीन'च्या बूस्टर डोसची चाचणी, एसईसीने दिली मंजूरी

व्हॉलंटियर्सना दुसऱ्या डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येणार आहे. हे व्हॉलंटियर्स बूस्टर डोस दिल्यानंतर सहा महिन्यांपर्यत त्यांच्या आरोग्याशी निगडीत ताजी माहिती घेत राहणार आहेत.

Corona vaccine booster dose trials by Bharat Biotech
भारत बायोटेकला लसीच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीसाठी परवानगी 

थोडं पण कामाचं

  • हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सीनच्या दोन डोसव्यतिरिक्त तिसऱ्या बूस्टर डोससाठीच्या चाचणीचा अर्ज दाखल
  • जवळपास १९० व्हॉलंटियर्सना दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस
  • तिसऱ्या चाचणीमध्ये लसीचा प्रभाव ८१ टक्के सकारात्मक

व्हॉलंटियर्सना दुसऱ्या डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येणार आहे. हे व्हॉलंटियर्स बूस्टर डोस दिल्यानंतर सहा महिन्यांपर्यत त्यांच्या आरोग्याशी निगडीत ताजी माहिती घेत राहणार आहेत. देशातील सर्वोच्च औषध नियंत्रक संस्थेच्या तज्ज्ञांच्या पॅनेलने भारत बायोटेकला कोव्हॅक्सीनच्या चाचणीत सहभागी असणाऱ्या व्हॉलंटियर्सवर लसीच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 

एसईसीची परवानगी

एसईसी म्हणजेच सबजेक्ट एक्सपर्ट कमिटी ही ड्रग्स कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया या देशातील औषधे आणि लसीसंदर्भातील सर्वोच्च नियामक संस्थेला सल्ला देत असते.  हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सीनच्या दोन डोसव्यतिरिक्त तिसऱ्या बूस्टर डोससाठीच्या चाचणीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या संदर्भात एसईसीने  कंपनीला प्राथमिक आणि मध्यम उद्दिष्टांच्या आणि विषयाच्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आकलनाची माहिती देण्यास सांगितले आहे. याशिवाय या चाचणीचा टेस्टिंग प्रोटोकॉलसुद्धा कंपनीला सादर करण्याची सूचना एसईसीने केली आहे. भारत बायोटेकने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जवळपास १९० व्हॉलंटियर्सना दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

८१ टक्के सुरक्षित

काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल ड्रग ऑथोरिटीला सादर केला आहे. तिसऱ्या चाचणीमध्ये लसीचा प्रभाव ८१ टक्के सकारात्मक दिसला आहे. कोव्हॅक्सीन ही कोरोना विषाणू (कोव्हिड -१९) प्रतिबंधात्मक आजारावरील लस आहे. कंपनीने लसीच्या अंतिम चाचणीच्या आधी लसीच्या संदर्भात चर्चा केली होती.

शेवटच्या टप्प्याच्या निकालाची घोषणा

कंपनीने ३ मार्चला आपल्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्याच्या निकालाची घोषणा केली आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी स्वीकारलेल्या दोन लसींपैकी एक लस भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लस आहे. तर दुसरी लस ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनिका व्हॅक्सीन आहे. ही लस भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारा बनवण्यात येते आहे. कोव्हॅक्सीनच्या शेवटचा टप्पा-२ च्या चाचणी निकालांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील चाचणीत आढळलेल्या अॅंटिबॉडी टाईट्सची संख्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीत  दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे.

कोरोना लसीकरण

सध्या भारतात कोरोना लसीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतो आहे. देशभरात अनेक नागरिकांना कोरोना लस देण्यात येते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने लसीकरणाच्या कार्यक्रमास गती देण्यात आली आहे. देशातील सर्व नागरिकांना टप्प्या टप्प्याने लस दिली जाणार आहे. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना नोंदणी करून लस देण्यात येते आहे. यात भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्युटने निर्माण केलेल्या कोरोना लसीचा महत्त्वाचा सहभाग आहे. या दोन्ही लसी भारतातच निर्मिती केल्या जात आहेत. कोरोना लसीच्या बूस्टर डोसच्या अंतिम टप्प्यातील चाचणी अहवाल लवकरच सादर करून बूस्टर डोससुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. भारताप्रमाणेच जगभरातही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम प्राधान्यक्रमाने राबवण्यात येतो आहे. भारतात यासाठी अनेक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून ऑनलाईन स्वरुपातदेखील या लसीकरणासाठीची नोंदणी नागरिकांना करता येते आहे. पुढील काही महिन्यात देशातील मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करून कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य मंत्रालय कारवाई करते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी