Covid-19 Symptoms:कोरोनाची आठ लक्षणे; हे लक्षण असल्यास त्वरीत घ्या उपचार

भारतासह जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे.

corona virus eight symptoms if you seen these symptoms do corona test
Covid-19 Symptoms:कोरोनाची आठ लक्षणे  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशाचे कोरोनाबाधितांची संख्या वाढली
  • कोरोनामुळे स्मरणशक्तीवर होतो परिणाम
  • कोरडा खोकला हे कोरोनाचे प्रमुख लक्षण आहे.

नवी दिल्ली  - 


नवी दिल्ली : भारतासह जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मागील २४ तासात १ लाख ३१ हजार ९६८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.दरम्यान कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या १ कोटी ३० लाख ६० हजार ५४२ झाली आहे. तर ७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून यासह मृत्यूमूखी होण्याची संख्या १ लाख ६७ हजारपर्यंत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोनाची ही दुसरी लहर असून खूप घातक आहे.दरम्यान एक अहवालात असे सांगण्यात आले आहे की, काहीजणांना कोरोनाचे लक्षण असतानाही ते त्यातून चांगले झाले आहेत. 

दरम्यान आज आम्ही आपल्याला कोरोनाचे लक्षण सांगत आहोत. हे लक्षण आपल्यालाही असतील तर आपण रुग्णालायात उपचारासाठी धाव घ्यावी. कोविड १९चे संसर्ग पाहता साधरण ताप चढत असतो. तसेच सर्दी, खोकला, थकवा, अंग दुखणे, असे लक्षण निर्दशनात येत आहेत. दरम्यान जर आपण कोरोनातून बरे जरी झाला असाल तरी आपल्याला खालीलपैकी लक्षण आढळून येऊ शकतात.

 डोळे लाल दुखणे किंवा लाल होणे

बऱ्याच जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना डोळे दुखी आणि लाल होण्याचे लक्षण दिसून आले. जर तुम्हालाही ताप असेल आणि डोळे लाल झाले असतील तर ते कोरोनाचे लक्षण असू शकतात. 

स्मरणशक्ती कमी होणे 

कोविड -१९ चा परिणाम डोक्यावर होऊन स्मरण शक्ती कमी होत असते. ज्या लोकांना स्मरण किंवा भ्रमची स्थिती कायम राहत असेल. किंवा एका ठिकाणी आपलं लक्ष क्रेंद्रित करण्यास त्रास होत असेल तर ते कोविड-१९ चे लक्षण असू शकते.

कोरडा खोकला

कोरड्या खोकला हे कोरोना व्हायरसचे प्रमुख लक्षण आहे. कोरोनाबाधितांच्या मते, कोविड -१९ ची लागण झाल्यानंतर येणारा खोकला हा साधरण खोकल्यापेक्षा वेगळा असतो. जर आपल्याला हा खोकला येत असेल तर त्वरीत दवाखान्यात जाऊन चाचणी करावी.

ताप 

कोविड-१९ चे प्रमुख लक्षण ताप पण आहे. ज्यांना कोरोना व्हायरसने ग्रासले असेल त्यांना ९९ ते १०३ फारेनहाइट ताप येऊ शकतो. यासह थंडी लागत असते.

वास घेण्याची आणि स्वाद घेण्याची शक्ती नाहिसा होणे 

कोरोनाने संक्रमित होणाऱ्या रुग्णांमध्ये वास घेण्याचे आणि स्वाद घेण्याची शक्ती नसते. कोरोना सर्वात आधी वास आणि स्वाद घेण्याच्या इंद्रियांवर हल्ला करत असतो.

श्वास घेण्यास त्रास होणे 

श्वास घेण्यास आपल्याला त्रास होत असेल तर आपण पटकन रुग्णालयात धाव घ्यावी. जर आपल्याला हे लक्षण असेल तर तुम्हाला कोरोना झाला असल्याचे समजावे.

अंग दुखी


एका अहवालानुसार, ५० टक्के कोरोना रुग्णांना अंग दुखी जाणवली होती. जर कोरोनाचे लागण झाली असेल तर आपल्याला अंग दुखी जाणवेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी