कोरोनाची भीती वाटतेय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, जाणून घ्या घरातील हळदीचे गुणधर्म

तब्येत पाणी
Updated Mar 17, 2020 | 17:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

हळद आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्त्व असतं. ज्यामुळे हळद अँटी-इंफ्लेमेटरी अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध होते. जाणून घ्या हळदीचे गुणधर्म आणि उपाय...

turmeric
कोरोना: रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या हळदीचे गुणधर्म पाहा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • स्वयंपाक घरातील हळद आहे अतिशय फायदेशीर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं करते काम.
  • हळदीमध्ये असलेलं करक्यूमिन तत्त्व हळदीला बनवतं अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध
  • दररोज जेवणात हळदीचा करा वापर, रात्री झोपवण्यापूर्वी गरम दुधात एक चिमूट हळद घालून पिणं फायदेशीर

मुंबई: ‘आरोग्य धन संपदा’ असं म्हटलं जातं. कारण जर आपल्या आरोग्य उत्तम असेल तर आपण काहीही करू शकतो, इतर कुठल्याही संकटाशी सामना करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी आरोग्य चांगलं पाहिजे. सध्या देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं हे किती महत्त्वाचं आहे, हे निष्पन्न झालंय. आपल्या शरीरात येणाऱ्या कुठल्याही बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून बचाव करण्याचं काम आपली रोगप्रतिकारक शक्ती करत असते. ज्यांची इम्यूनिटी पावर कमी त्यांच्यावर आजारांचा परिणाम लगेच होतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्यूनिटी पावर वाढविण्याचे सर्व जण प्रयत्न करत असतात.

आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे प्रत्येकाच्या घरात असलेली हळद होय. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्त्व आढळतं. त्यामुळे हळद ही अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध असते. हळदीच्या याच गुणांना लाभ मिळवून घेण्यासाठी स्वयंपाक करताना आपल्या जेवणात हळदीचा वापर अवश्य करावा. तसंच रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये एक चिमूट हळद घालून ते हळदीचं दूध प्यावं.

‘एसएनईसी ३०’ ची निर्मिती करणारे आरब्रो फार्मास्युटिकल्सचे डॉ. सुभाष अरोरा यांनी सांगितलं, करक्यूमिनमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुण असतात. त्यामुळे शरीराचं रक्षण होतं. श्वसनाशी निगडित समस्या या अतिसंवेदनशील रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना उद्भवतात. करक्यूमिन आपली हिच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं काम करतं.

हळदीमध्ये ३-५ टक्के करक्यूमिन असतं. हे झाडांमधून उत्पन्न होणारं एक रसायन आहे. ज्यात उपचारासंबंधी अनेक गुण उपस्थित असतात. हळद सर्दी-खोकला, श्वास घेण्यात त्रास, अस्थमा इत्यादी संक्रमित आजार, व्हायरल ताप सारख्या समस्यांशी दोन हात करते. हळदीमुळे जळजळही कमी होते. त्यामुळेच शरीर हेल्दी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात हळदीचं सेवन दररोज करणं आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...