माउथवॉशमुळे अवघ्या काही सेकंदात कोरोना होणार नष्ट, जाणून घ्या सविस्तर 

Mouthwash can kill coronavirus within 30 seconds: शास्त्रज्ञांनी केलेल्या चाचणीत असे समोर आले की, कोरोना व्हायरसचा खात्मा एक माउथवॉश करु शकतो. या संदर्भात अद्याप चाचणी सुरू आहे ज्याचे निकाल पुढील वर्षी येणार

corona_update
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

थोडं पण कामाचं

  • माउथवॉश अवघ्या ३० सेकंदात करु शकतो कोरोनाचा खात्मा 
  • वैज्ञानिकांनी आपल्या चाचणीनंतर केला दावा 
  • या संदर्भातील चाचणीचे निकाल पुढील वर्षापर्यंत येण्याची अपेक्षा 

लंडन : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus)वर लस निर्मितीचे काम वेगवेगळ्या देशांत सुरू आहे. त्याच दरम्यान आता संशोधकांनी एक दावा केला आहे की माउथवॉश (mouthwash) वापरुन कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकतो. संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, कोरोना व्हायरसचा खात्मा माऊथवॉशने ३० सेकंदात केला जाईल. यूकेमधील कार्डिक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात समोर आले आहे की, काही माउथवॉश लार (लाळ) कोरोना व्हायरस नष्ट करण्यास मदत करु शकतात. मात्र, या संदर्भातील संशोधनाचा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाहीये.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, संशोधनात असे समोर आले आहे की माउथवॉशच्या वापराने लाळेच्या सहाय्याने व्हायरसचा खात्मा होण्यास मदत होते. मात्र, कोरोना व्हायरसवर उपचार म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो असा कोणताही पुरावा नाहीये. असेही म्हणून शकत नाही की व्हायरस श्वसननलिका किंवा फुफ्फुसापर्यंत पोहोचणार नाही. संशोधन करणाऱ्यांनी म्हटलं, "इन व्रिटो सार्स-कोव-२ निष्क्रिय करण्यासाठई माउथवॉशच्या क्षमतेची चाचणी करण्यात आली. संक्रमणतेची कमी आढळून येण्यासाठी सर्व प्रोटोकॉलचा वापर करुन चाचणी करण्यात आली."

माउथवॉशमध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची क्षमता

माउथवॉशची चाचणी प्रयोगशाळेतील अशा परिस्थितीत करण्यात आली जेथे तोंडात किंवा नाकासारख्या टेस्ट ट्यूबसाठी तयार केलेल्या डिझाइननुसार झाली. संशोधकांनी सांगितले की, माउथवॉशमध्ये कमीत कमी ०.०७ टक्के सटाइपॅराडिनियम क्लोराइड आहे ज्यामध्ये व्हायरस मारण्याची क्षमता दर्शवतात. या संशोधनाचे प्रमुख रिचर्ड स्टॅनटन यांच्या हवाल्याने बीबीसीने सांगितले की, या संशोधनात असे समोर आले आहे की रोगाशी लढा देण्यासाठी अनेक सामान्यपणे माउथवॉश उपलब्ध आहेत जे सार्स-कोव्ह-२ कोरोनाव्हारस (आणि इतर संबंधित व्हायरस) नष्ट करु शकतात.

संशोधनाचे निकाल पुढीलवर्षी येऊ शकतात 

रिसर्च टीमच्या मते, क्लिनिकल ट्रायममध्ये हे समोर येणार आहे की, कार्डिफच्या रुग्णालयात कोविड-१९ बाधितांच्या लाळेत व्हायरसची पातळी कमी होण्यास मदत होते की नाही, तसेच याचे निकाल पुढील वर्षीय येण्याची शक्यता आहे. संशोधक डेव्हिड थॉमस म्हणाले, सुरुवाती परिणाम हे सकारात्मक होते मात्र, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखता येईल याचा पुरावा क्लिनिकल चाचण्यांत उपलब्ध झालेला नाहीये. 

माउथवॉश लॅबमध्ये प्रभावी 

हे माउथवॉश प्रयोगशाळेत व्हायरसला खूपच प्रभावीपणे नष्ट करतात हे स्पष्ट आहे मात्र, बाधितांवर हे माउथवॉश प्रभावी ठरेल की नाही हे पहावं लागेल. ऑक्टोबर महिन्यात जर्नल ऑफ मेडिकल व्हायरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, काही ओरल अँटीसेप्टिक्स आणि माउथवॉशमध्ये कोरोना व्हायरस नष्ट करण्याची क्षमता असू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी