थंडीमध्ये प्रदूषणामुळे आणखी वाईट होऊ शकतो कोव्हिड-19चा प्रभाव, लोकांनी तयार राहावे

तब्येत पाणी
Updated Oct 19, 2020 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाच्या सोबतच थंडीमध्ये प्रदूषणामुळे लोकांना आणखी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ शकते.

Covid-19 situation may worsen in cold due to pollution, be ready- Experts
थंडीमध्ये प्रदूषणामुळे आणखी वाईट होऊ शकतो कोव्हिड-19चा प्रभाव, लोकांनी तयार राहावे- तज्ञ  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • वायू प्रदूषकांच्या संपर्कात दीर्घकाळ राहणे गंभीर संक्रमण आणि अधिक मृत्यूदराशी जोडलेले
  • थंडी वाढतानाच प्रदूषणही वाढल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत होऊ शकते वेगाने वाढ
  • तज्ज्ञांनी दिली प्रदूषित वातावरणात विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये निळेशार आकाश (Clear blue sky) पाहणाऱ्या आणि शुद्ध हवेत श्वास (unpolluted air) घेणाऱ्या दिल्लीकरांना (people in Delhi) पुन्हा एकदा धुराने भरलेल्या आकाशाचा (sky full of smoke) सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांनी (experts) लोकांना थंडीच्या ऋतूसाठी सज्ज होण्याचा सल्ला (advice to be prepared for winter) दिला आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे (increasing pollution) कोव्हिड-19चा परिणाम (Covid-19 effects) अधिक गंभीर (more severe) होऊ शकतो. पर्यावरण आणि आरोग्य तज्ञांनी लोकांना सांगितले आहे की आता अधिक सतर्क राहा, कारण वायूप्रदूषकांच्या (air pollutants) संपर्कात दीर्घकाळ राहणे गंभीर संक्रमण आणि अधिक मृत्यूदराशी जोडलेले आहे.

कोव्हिडच्या काळात समस्या अधिक जास्त

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे नुकसान झाल्याने कोव्हिड-19सोबतच न्यूमोनियासारखे आजारही होऊ शकतात. ग्रीनपीस इंडियासाठी पाणी आणि वायूच्या क्षेत्रात काम करणारे अविनाश चंचल म्हणतात, ‘याबाबत पुरेसे पुरावे आहेत की वायूप्रदूषकांच्या संपर्कात राहण्याने श्वसनासंबंधी आपली संवेदनशीलता वाढते आणि त्यामुळे प्रसार आणि संसर्ग यातील गांभीर्य सर्वोच्च पातळीवर असते.’

त्यांनी म्हटले, ‘संशोधकांनी वायूप्रदूषणाचा संबंध आपली रोगप्रतिकारकशक्ती कमजोर करणाऱ्या प्रणालीशी जोडला आहे. कोव्हिड-19च्या केसेसमध्ये सध्याचे संशोधन सांगत आहे की वायूप्रदूषकांच्या संपर्कात दीर्घकाळ राहणे गंभीर संक्रमण आणि अधिक मृत्यूदराशी जोडलेले आहे.’ थंडीचा काळ हा उत्तर भारतात दरवर्षी प्रदूषित हवाही आणतो आणि यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परिस्थिती आणखी वाईट असू शकते. दिल्ली-एनसीआरच्या आकाशात १५ ऑक्टोबरपासून धुके आणि धुराचा थर आहे आणि या भागात हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ स्तरावर आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनच्या अंतर्गत वीजजनित्रांवर बंधनांसह वायूप्रदूषणविरोधी कडक उपाय लागू करण्यात आले आहेत.

कोरोनापासून सावध राहा

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ७३,७०,४६८ इतकी झाली आहे तर एका दिवसात ६३,३७१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दिल्लीच्या उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या डॉक्टर सूचिन बजाज यांनी सांगितले की थंडीच्या सुरुवातीच्या काळात आणि पेंढा जाळण्यामुळे दमा आणि फुफ्फुसे आणि श्वसनासंबंधी इतर आजारांमध्ये वाढ होते, पण यावर्षी कोरोनामुळे अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. बजाज म्हणाले, ‘जेव्हा आपली फुफ्फुसे पूर्णपणे निरोगी नसतील आणि कमजोर असतील तेव्हा कोरोनाच्या काळात आपल्याला न्यूमोनियासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्याला येत्या दिवसांमध्ये ‘एसएमएस’ म्हणजेच मास्क, शारीरिक अंतर आणि स्वच्छता यांची काळजी घ्यावी लागेल.’

अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे वायूप्रदूषण

पृथ्वीविज्ञान मंत्रालायाच्या वायू गुणवत्ता देखरेख प्रणाली ‘सफर’ने दिलेल्या माहितीनुसार शेतांमध्ये लावण्यात आलेल्या आगींमुळे दिल्लीत गुरुवारी पीएम २.५ जवळपास सहा टक्के होते. बुधवारी हेच प्रमाण साधारण एक टक्का इतके होते. तर मंगळवार, सोमवार आणि रविवारी हे प्रमाण साधारण तीन टक्के होते. पीजीआय चंडीगढमध्ये पर्यावरण आरोग्य विषयाचे सहाय्यक प्राध्यापक रविंद्र खाईवाल सांगतात की वायूप्रदूषण हे अकाली मृत्यूचे एक मुख्य कारण आहे. ते म्हणाले, ‘अकाली मृत्यू आणि असंसर्गिक रोग होण्यामागे वायूप्रदूषणाचा मोठा वाटा असतो. वायूप्रदूषण हे कोरोनाच्या गांभीर्याशीही जोडलेले असल्याचे पुरावे मिळाले आहेत.’

त्यांनी सांगितले की पेंढा जाळल्याने प्रदूषण हे २०-४० टक्क्यांनी वाढू शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की मास्क वापरणे हा प्रदूषणासोबतच कोरोनावरही सर्वात प्रभावी उपाय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी