Covid-19 vaccine: 'या' गोष्टी खाल्यानं नाही होणार कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स

राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी संख्या आटोक्यात यावी यासाठी सरकार वेगाने लसीकरण करत आहे. पण कोरोनावरील लस घेतल्यानंतर काहींना त्या लसींचा साईड इफेक्ट होत असल्यासं सांगण्यात येत आहे.

Covid-19 vaccine these healthy foods save you from side effect
'या' गोष्टी खाल्यानं नाही होणार कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर योग्य आहार हवा
  • जेवणामध्ये हिरवा भाजीपाला असावा
  • कांदा- लसूण रोगप्रतिकारक शक्तीसाठी आहे चांगले

मुंबई : राज्यासह देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी संख्या आटोक्यात यावी यासाठी सरकार वेगाने लसीकरण करत आहे. पण कोरोनावरील लस घेतल्यानंतर काहींना त्या लसींचा साईड इफेक्ट होत असल्यासं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनाही साईड इफेक्टविषयी होत असल्याच्या वृत्ताला सहमती दिली परंतु याला नागरिकांनी घाबरू नये असा सल्लाही डॉक्टर देत आहेत

. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याने तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही.
कोविड लसीनंतर होणाऱ्या साईड इफेक्ट्स विषयी हार्वर्ड न्यूट्रिशियन मानसशास्त्रज्ञ (Harvard Nutritionist Psychologist) डॉ. उमा नायडू (Dr. Uma Naidu) म्हणाल्या की, 'जर आपल्याला साईड इफेक्ट (Side Effect) होणार असेल तर आपल्या आहाराविषयी काळजी घेणं आवश्यक आहे. लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर कोणता आहार सेवन केला पाहिजे, याची काळजी घ्यायला हवी'.

हिरवा भाजीपाला 

मानसशास्त्रज्ञ डॉ. उमा नायडू म्हणाल्या की, आपल्या जेवणात हिरवा भाजीपाला असावा. यात पालक, ब्रोकोली, सारख्या भाज्या आवश्यक आहे. यासर्व भाज्या सुजेपासून होणारा त्रास कमी करतात. 
कांदा आणि लसूण

या दोन्ही वस्तू इम्यूनिटी वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्रोबायोटिक्समध्ये समृद्ध आहे जे आपल्या आतड्यात प्रोबायोटिक्स (चांगले बॅक्टेरिया) पोसतात.
हळद  -

सूज कमी करण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. यासह तणावापासून वाचण्यासाठी हळद गुणकारी आहे. यासाठी हळदीचे सेवन करणं आवश्यक आहे.
 ब्लूबेरीज
ब्लू बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असते. सेरोटोनिनची पातळी वाढविण्यासाठी ब्लू बेरीज खूप फायदेशीर आहे. प्रोबायोटिक अधिक असलेल्या दहीसह ब्लू बेरीज खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी