Corona vaccine: कोरोनावरील लस तिसऱ्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावी, Pfizerचा दावा

Pfizer corona vaccine: कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील डॉक्टर, संशोधक कार्यरत आहेत. त्याच दरम्यान आता एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. Pfizerची लस शेवटच्या टप्प्यात ९५टक्के प्रभावीचा दावा

Pfizer covid-19 vaccine
फोटो सौजन्य: Pfizer.com 

Corona Vaccine: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशांत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनावर लस विकसित करण्याचे काम सुरू असतानाच आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना लस विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या Pfizer कंपनीने सांगितले की, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचे खूपच चांगले आणि सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. Pfizer ने सांगितले की, आम्ही BioNTech Group सोबत घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटत आहे की, कोविड-१९ वरील लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वच बाबतीत सकारात्मक आढळून आली आहे.

प्राथमिक कार्यक्षमतेच्या विश्लेषणाने बीएनटी १६२बी २ ची पहिल्या खेपेच्या २८ दिवसांनंतर कोविड-१९वर सुरुवातीला ९५ टक्के प्रभावी असण्याचे संकेत मिळत आहेत. कोविड-१९च्या १७० प्रकरणांचे मुल्यांकन करण्यात आले होते. 

महत्वाचे म्हणजे Pfizer ने घोषित केले आहे की, ही लस उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फारच महत्वाची ठरली आहे. जे आपात्कालीन उपयोग प्राधिकरण (EUA)साठी अमेरिकन खाद्य आणि औषध प्रशासन (FDA)चे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

विशेष म्हणजे कोरोना लस तयार कऱण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या जगभरातील अनेक कंपन्यांनी दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेल्या लस ९० ते ९५ टक्के प्रभावी आहेत. तर अमेरिकन कंपनी Pfizerची कोरोनावरील लसीने खूपच प्रभावी असल्याचे दिसून आली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांच्या लसीच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की, कोविड-१९ ला रोकण्यासाठी त्यांची लस ९० टक्के प्रभावी असू शकते. ही भारतासोबतच जगभरासाठी एक चांगली बातमी म्हणून पाहिलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी