Winter Health Tips: हिवाळ्यात टाचांना तडे का जातात? ही असतात महत्त्वाची कारणे...अशी घ्या काळजी

Skin Care Tips : थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, निर्जीव होते आणि त्वचा खराब होते. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे हिवाळ्यात टाचा फुटतात. अनेक लोकांना ही समस्या उद्भवते. टाचांना पडलेल्या भेगांमुळे अनेकजण त्रस्त असतात. टाचांना पडलेल्या भेगामुळे सौंदर्य कमी होते. टाचांच्या भेगांकडे आणि त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Cracked Heels
टाचांच्या भेगांची समस्या 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या येतात
  • त्वचेच्या समस्या ही एक मोठी तक्रार
  • टाचांना भेगा पडणे, तडे जाणे याची कारणे आणि उपाय

Cracked Heels Causes In Winter: नवी दिल्ली : प्रत्येक ऋतूत आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. हिवाळ्यातदेखील आरोग्याच्या काही समस्यांना (Winter Health problems)तोंड द्यावे लागते. यात त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात. कारण थंडीमुळे त्वचा कोरडी (Dry Skin) पडते, निर्जीव होते आणि त्वचा खराब होते. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे हिवाळ्यात टाचा फुटतात. अनेक लोकांना ही समस्या उद्भवते. टाचांना पडलेल्या भेगांमुळे (Cracked Heels) अनेकजण त्रस्त असतात. टाचांना पडलेल्या भेगामुळे सौंदर्य कमी होते. टाचांच्या भेगांकडे आणि त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. हिवाळ्यात टाचांना भेगा का पडतात आणि कशी काळजी घ्यायची ते पाहूया. पण क्रॅक टाचांच्या समस्येकडे दुर्लक्ष करता कामा नये. चला जाणून घेऊया हिवाळ्यात टाचांना तडे जाण्याची कारणे काय आहेत? (Cracked heels are the major problem in winter, know the reason read in Marathi)

अधिक वाचा  : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची कारणे -

चप्पलांचा वापर, टाचा उघड्या ठेवणे

हिवाळ्यात थंडी वाढलेली असते. त्यामुळे घटलेल्या तापमानाचा त्वचेवर थेट परिणाम होतो. चपलांच्या वापरांमुळे टाचा उघड्या पडतात. उघड्या चप्पल यातून धूळ, घाण आणि प्रदूषणाचे कण टाचांच्या त्वचेवर जमा होतात. परिणामी  टाचा फुटू लागतात. म्हणूनच हिवाळ्यात नेहमी बूट घालावेत. त्यामुळे तुमच्या टाचांवर थेट बाहेरच्या हवा आणि धुळीचा परिणाम होत नाही. याच्या मदतीने तुम्ही टाच फुटण्याची समस्या टाळू शकता.

गरम पाण्याचे आंघोळ

हिवाळ्यात थंडी असते त्यामुळे साहजिकच गरम पाण्याने आंघोळ केली जाते. मात्र यामुळेदेखील टाचांना तडे जातात. गरम पाण्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते. टाचेची त्वचा कोरडी पडल्यामुळे भेगा पडण्यास सुरूवात होते. त्यामुळे टाचांना भेगा पडू नये असे वाटत असेल तर गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करा. शिवाय टाचांना मॉइश्चरायझर लावा.

अधिक वाचा  : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने

कोरडी त्वचा

थंडीमुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि यातूनच त्वचेच्या समस्या सुरू होतात. म्हणून तुमची त्वचा जर कोरड्या प्रकारातील असेल तर रात्री झोपण्यापूर्वी टाचांना  बॉडी लोशन लावावे.

अधिक वाचा  :नवरा-बाययकोच्या नात्याची कमकुवत नाळ घट्ट करायची आहे?

खूप वेळ उभे राहणे

जास्त वेळ उभे राहिल्यास टाचांवर ताण पडतो. परिणामी टाचांच्या त्वचेवरदेखील ताण येतो. त्यात जर तुम्ही चप्पल घातली असेल किंवा अनवाणी असाल तर टाचांना भेगा पडतात. यामुळे हिवाळ्यात टाचांचे संरक्षण करण्यासाठी पायात मोजे घालावे.

हिवाळ्यात वेगवेगळे आजार होण्याची शक्यता अधिक असते. या समस्येचा सामना महिला आणि पुरुष या दोघांनाही करावा लागू शकतो. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी