Lips care tips:उन्हाळा सुरू होताच ओठ फुटू लागले आहेत, या घरगुती उपायांच्या मदतीने करा सुटका

तब्येत पाणी
Updated Apr 14, 2023 | 18:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Remedies for cracked lips: उन्हाळा सुरू होताच ओठ फुटू लागतात. बहुतांश लोकांना गरमीत हा त्रास होऊ लागतो, हे फाटलेले ओठ सौंदर्यात अडचण निर्माण करण्याचे काम करतात.

फाटलेल्या ओठांची योग्य काळजी न घेतल्यास त्यातून रक्तस्त्रावही सुरू होतो.
फाटलेल्या ओठांसाठी हे करा घरगुती उपाय   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • फाटलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय 
  • उन्हाळा सुरू होताच ओठ फुटू लागण्याच्या समस्या सुरू होतात
  • जर तुम्ही देखील फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांच्या मदतीने,  यापासून सुटका मिळवू शकता. 

Lips care tips: ऊन्हाळा सुरू होताच त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात टॅनिंग, सनबर्न अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यात अशीदेखील एक समस्या आहे ज्याकडे बरेच लोकं दुर्लक्ष करतात. ती समस्या म्हणजे फाटलेले ओठ. उन्हाळा सुरू होताच ओठ फुटायला लागतात. बहुतांश लोकांना गरमी मध्ये ओठ फुटण्याचा त्रास होतो. हे फाटलेले ओठ तुमच्या सौंदर्यातही बाधा घालतात. (cracked lips problem in summer season get rid of it with the help of these home remedies)

फाटलेल्या ओठांची योग्य काळजी न घेतल्यास त्यातून रक्तस्त्रावही सुरू होतो. फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक प्रकारचे लिप बाम आणि लोशन वापरले जाते. मात्र,  या सर्व उत्पादनांचा परिणाम काही वेळापुरताच टिकून राहतो. जर तुम्ही देखील फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर या घरगुती उपायांच्या मदतीने,  यापासून सुटका मिळवू शकता. 

फाटलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय 

अधिक वाचा: Adani China Row: मॉरिस चांग अडकले वादात, म्हणाले- मी तैवानचा नागरिक आहे, माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही

मध

मध हे फाटलेल्या ओठांसाठी प्रभावी माध्यम आहे. त्याच्या एंटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे ओठ मुलायम होतात. त्यामुळे मधाचे सेवन केल्याने फाटलेल्या ओठांची समस्या तात्काळ दूर होईल. 

मलई

दुधाची मलई वापरल्याने ओठ मुलायम होतात. मलईमध्ये लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावले तर ओठ फुटण्याच्या समस्येपासून लवकर सुटका होते. 

बदामाचे तेल

बदामाचे तेल ओठांच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा. 

अधिक वाचा : ​Atiq Ahmed son encounter: उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

हळद

अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त हळद फाटलेल्या ओठांना त्वरित बरे करते. चिमूटभर हळद दुधात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या ओठांवर लावा.

खोबरे तेल

ओठांची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी खोबरेल तेलाचा देखील तुम्ही वापर करू शकता. खोबरे तेलाने ओठांना मसाज करा त्यामुळे ओठ ओले आणि मुलायम होतील.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी