Hair Mask: मजबूत केसांसाठी दही हेअर मास्क वापरा...केस होतील सुंदर आणि मुलायम

Hair care tips : केसांची निगा राखणे, केसांचे आरोग्य (Hair care)राखणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी काही हेअर पॅक (Hair Mask) खूपच फायदेशीर ठरतात. खास करून दही केसांसाठी खूप उपयोगी असते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात, ज्यामुळे केसांच्या समस्यांपासून सुटका मिळते. दही केस लांब आणि दाट होण्यास मदत करतात. तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क बनवून त्याचा वापर करू शकता.

Hair Care Tips
केसांसाठी हेअर मास्क 
थोडं पण कामाचं
  • केसांचे आरोग्य राखणे खूप महत्त्वाचे
  • अनेकांना केसांच्या अनेक समस्या असतात
  • दह्यामध्ये असलेले प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड केसांच्या पोषणासाठी खूप फायदेशीर असते.

Curd Hair Mask : नवी दिल्ली : आपल्या व्यक्तिमत्वात आपले केस (Hairs) खूप प्रभाव टाकतात. सुंदर आणि मुलायम केसांमुळे व्यक्तिमत्व खुलून येते. त्यासाठी केसांची निगा राखणे, केसांचे आरोग्य (Hair care)राखणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी काही हेअर पॅक (Hair Mask) खूपच फायदेशीर ठरतात. खास करून दही केसांसाठी खूप उपयोगी असते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात, ज्यामुळे केसांच्या समस्यांपासून सुटका मिळते. दही केस लांब आणि दाट होण्यास मदत करतात. दह्यामध्ये असलेले प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड केसांच्या पोषणासाठी खूप फायदेशीर असते. केस पांढरे होणे, कोंडा होणे, कोरडेपणा इत्यादी समस्या टाळण्यासाठी दही गुणकारी असते. तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क बनवून त्याचा वापर करू शकता. दह्यापासून हेअर मास्क कसे बनवायचे हे जाणून घेऊया. (Curd hair mask is useful for health of hairs)

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

दही आणि अंड्याचे हेअर मास्क

दही आणि अंडी दोघांमध्येही भरपूर पोषक तत्त्वे असतात. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात 3-4 चमचे दही घ्या. त्यानंतर त्यामध्ये अंड्यातील पिवळ बलक घाला. आता हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हा हेअर मास्क टाळूवर लावा. त्यानंतर 30 मिनिटांनी तो साध्या पाण्याने धुवून टाका.

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

मेहंदी आणि दही

मेहंदीदेखील केसांसाठी उपयुक्त असते. यासाठी एका भांड्यात मेंदी पावडर घ्या. त्यात 2-3 चमचे दही घाला. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. हे मिश्रण चांगले फेटून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि 20-30 मिनिटांनी पाण्याने धुवा. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

कोरफड आणि दही

कोरफड तर औषधी गुणधर्मासाठी जाणली जाते. कोरफडीचा गर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यापासून हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात 4 टेबलस्पून दही घ्या. आता त्यामध्ये एक किंवा दोन टेबलस्पून कोरफडीचा गर घाला. आता हा मास्क केसांना लावा. साधारण 30 मिनिटांनंतर तो पाण्याने धुवा. 

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

खोबरेल तेल आणि दही

खोबरेल तेल एरवीदेखील केसांसाठी खूप फायदेशीर असते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक कप दह्यामध्ये 2 चमचे खोबरेल तेल मिसळून घ्या. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आता हा हेअर मास्क केसांना लावा. 20-30 मिनिटांनी साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

या पद्धतीने हेअर मास्क वापरल्यास तुमच्या केसांना चांगले पोषण मिळेल आणि तुमचे केस निरोगी आणि सुंदर होतील. केसांची नियमितपणे काळजी घेतल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणताही उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी