गरमीच्या दिवसात (Summer season) दह्याचा (curd) समावेश आपल्या आहारात (diet) करणे हे आरोग्यासाठी (health) उत्तम आहे. हे आपल्याला पचनात (digestion) मदत करते आणि यातील पोषकतत्वे (nutrition) पचनसंस्थेत (digestive system) सहज शोषली जातात. दह्यातील चांगले जिवाणूही (good bacteria) रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवण्यासाठी फायदेशीर (beneficial) असतात. दही हे एक उत्तम प्रोबायोटिक (pro-biotic) मानले जाते ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या (health issues) दूर होतात. यात भरपूर प्रमाणात प्रथिने (proteins) आणि कॅल्शियम (calcium) असते. दह्यातून आपण अनेक पदार्थ (dishes) तयार करू शकता. जाणून घ्या यातलेच काही चविष्ट (tasty) आणि आरोग्यदायी पदार्थ.
ज्या लोकांना दह्याची चव आवडत नाही त्यांच्यासाठी कोशिंबीर हा एक उत्तम पर्याय आहे. आपण उन्हाळ्याच्या दिवसात दह्यापासून कोशिंबीर तयार करू शकता. यामुळे फक्त जेवणाची चवच वाढणार नाही तर आरोग्यही सुधारते. आपण या कोशिंबिरीत बुंदी किंवा त्या ऋतूतील भाज्या घालू शकता.
आपण दह्यापासून आणि काही औषधी मसाले किंवा पदार्थ वापरून डिप तयार करू शकता. हे डिप कुरकुरीत भाज्या किंवा स्टार्टर्ससोबत खाऊ शकता.
दह्यावर आपण सुकामेव्याचे टॉपिंग किंवा फळेही घालू शकता. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील आणि शरीरात गारवा राहील.
दह्याच्या मदतीने उत्तम स्मूदी तयार करता येते. यात आपण आपल्या आवडीची फळे घालू शकता. व्यायाम केल्यानंतर स्मूदीचे सेवन करणे अतिशय चांगले असते. तसेच हे नाश्ता म्हणूनही खाता येते.
गरमी येताच लोक दह्याचे सेवन करण्यास सुरुवात करतात. काही लोक घरातच दही लावण्याऐवजी बाहेरून दही आणतात. बाजारात मलईच्या दुधाने दही तयार केले जाते जे घरी तयार केलेल्या दह्याइतके फायदेशीर असत नाही. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वर सांगितलेल्या सर्व उपायांनी दह्याचा वापर आपल्या आहारात करा. यामुळे आपल्या आरोग्यालाच फायदा होणार नाही तर त्याची चवही वाढेल.