Weight loss tips with fruit: वजन कमी करायचे आहे, मग दह्यासोबत खा हे फळं

तब्येत पाणी
Updated May 08, 2019 | 12:15 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Weight loss tips, diet plan: वजन कमी करण्यासाठी लोकं बरीच मेहनत करत असतात. तरी सुद्धा त्यांचं वजन कमी होतं नाही. मात्र आंबा खाऊन वजन सहज कमी केलं जाऊ शकतं. कसं ते हे जाणून घेण्यासाठी खालील वृत्त सविस्तर वाचा. 

Weight loss Diet Tips
वजन कमी करायचे आहे, मग दह्यासोबत खा हे फळं  |  फोटो सौजन्य: Instagram

Weight loss tips: आंब्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी या व्यतिरिक्त सिट्रिक अॅसिड, कार्बोहायड्रेट, सल्फाइड, गॅलिक अॅसिड आणि आर्यन असतं. जे गहू, तांदूळ याच्यापेक्षाही जास्त ताकद असते आणि बऱ्याच वेळेसाठी तुमचं पोट भरलेलं राहते. त्यामुळं सारखी सारखी भूक लागल्याची समस्या देखील उद्भवत नाही. आंब्यामध्ये लेप्टिन देखील असतं. जे भूकेला कंट्रोल करतं. तसचं आंबा शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी मदत करते. आंब्यासोबत जेव्हा तुम्ही दही खात असाल तर ते आणखीनच फायदेशीर ठरेल. आंब्यासोबत दही खाल्ल्यास लवकरच वजन कमी होतं. जर का तुम्हांला १ ते २ महिन्यात वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आंब्या आणि दही खाण्यास सुरूवात करा. 

दही आणि आंबा एकत्र खाण्याचं कारण 

दही आणि आंबा एकत्र खाल्ल्यानं शरीरात आवश्यक पोषक तत्व जातात. यात फॅट नसतं. त्यामुळे हे मोनो डाएट वेट लॉससाठी चांगलं आहे. तुम्ही नाश्ता किंवा लंचमध्ये केवळ आंबा आणि दही खात असाल तर तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप वेगानं काम करेल. हे खाल्ल्यानंतर तुम्हांला केवळ पाणी प्यायचं असते. जवळपास तीन लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. मोनो डाएट हे कोणत्याही प्रकारचा उपवास नसतो. ही देखील एक डाएट थेरपी आहे. यामुळे आपली बुद्धी वेगानं काम करते आणि तुमचं वजन देखील कमी होतं. लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही दही आणि आंबा खात असाल, तेव्हा त्यांच्यासोबत अन्य काही खाऊ नये. कारण त्यामुळे तुमचं डाएट प्लान काम करू शकणार नाही. 

आंबा खाण्याचे फायदे 

  1. अनेक आहार-शास्त्रज्ञांनी आंबा हे  वजन कमी करण्यासाठीचं औषध असल्याचं सांगितलं आहे. कारण याचे काही दुष्परिणाम नाही आहेत. 
  2. आंब्याचं रहस्य हे त्यांच्या बीमध्ये (कोयरी) लपलं आहे. आंब्याची बीमध्ये विद्रव्य फायबर आणि चरबी असते. 
  3. आंब्याच्या बीमध्ये असलेलं फायबर आणि चरबी शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 
  4. आंब्या खाल्ल्यनं भूक कमी लागते. शरीरातील अतिरिक्त कॅलेरी देखील बर्न होते.आंब्यात लेप्टिन नावाचं केमिकलं असतं. ज्यामुळे भूक कमी लागते. 
  5. आंब्यात कोलेस्ट्रॉल असतं. याच्यात असलेलं एडिपोनेक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि इंन्सुलिनच्या निर्मितीत वाढ करतं. ज्यामुळे अतिरिक्त चरबी आपोआप ऊर्जामध्ये बदलून जाते. 
  6. आंब्या खाल्ल्यानं शरीरातील रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. 


आंब्यात फायबर असतात. फायबर दह्यासोबत मिसळल्यानंतर पचनक्रिया चांगली होते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटामिन बी सारखे पोषकतत्व असतात. जे डायजेशनसाठी चांगलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी