वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्ता ज्यूस, कमी होईल शरिरातील चरबी

भारतीय आहारात (Diet) ज्याप्रमाणे कोथिंबिरी (Cilantro)चा उपयोग होतो, त्याचप्रमाणे कढीपत्ता (Curry leaf)ही वापरला जातो. महाष्ट्रीयन (Maharashtrian) आणि दक्षिण भारतीय आहारात (South indian diet) कढीपत्ता सर्वात जास

Curry leaf  juice is beneficial for weight loss
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्ता ज्यूस  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • दररोज कढीपत्त्याचा ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरिरात जमा झालेला फॅट हळू- हळू कमी होईल.
  • उपाशी पोटी कढीपत्त्याचा ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरिरात बॉडी डिटॉक्स होईल.
  • कढीपत्ता ज्यूसमुळे तुमची पचनशक्ती मजबूत होईल.

नवी दिल्ली : भारतीय आहारात (Diet) ज्याप्रमाणे कोथिंबिरी (Cilantro)चा उपयोग होतो, त्याचप्रमाणे कढीपत्ता (Curry leaf)ही वापरला जातो. महाष्ट्रीयन (Maharashtrian) आणि दक्षिण भारतीय आहारात (South indian diet) कढीपत्ता सर्वात जास्त वापरला जातो. कढीपत्ता भाजीची चव वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे. इतकेच काय अनेक प्रकारच्या रोगांवरील उपायांसाठी कढीपत्ताचा वापर होतो. उपाशी पोटी कढीपत्ता खाल्याने खूप फायदे होत असतात, मधुमेहा (Diabetes)च्या रुग्णांसाठी हे एक रामबाण उपाय आहे. 

नियमित रुपात कढीपत्ता खाल्याने शरिरात जमा झालेला अतिरिक्त (फॅट) चरबीपासून आपली सूटका होते आणि कमी वजन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान कढीपत्तामध्ये भरपूर पोषण तत्वे असतात. कढीपत्ता आपल्या पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवणं, लठ्ठपणा कमी करणं, केस गळती यासारख्या अनेक आजारांवर कढीपत्ता एक चांगला उपाय आहे. आपल्या शरिरातील पचनशक्ती सुधारत असल्याने शरिरातील फॅट कमी करतो आणि आपलं वजन कमी होते. जर तुम्ही दररोज सकाळी कढीपत्त्याचा ज्यूस किंवा चहा पीत असाल तर तुमचं वजन निश्चित कमी होईल.

कढीपत्ता ज्यूसचे काही इतर फायदे

पचनशक्ती सुधारते 

जर पाचनतंत्र व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्या शरिरात फॅट जमा होत असतो. कढीपत्ता खाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते, यामुळे गॅस आणि अपचनची समस्या होत नाही. याशिवाय कढीपत्ता खाण्याने आतड्यांना फायदा होत असतो, त्यामुळे आपलं पोट व्यवस्थीत राहत असते.

बॉडी को डिटॉक्स

 दररोज कढीपत्ता खाल्याने शरीर नैसर्गिक डिटॉक्स होत असते. कढीपत्ताच्या सेवनाने शरीर साफ होत असते आणि हानिकारक विषयुक्त पदार्थ शरिरातून बाहेर निघून जात असतात. याशिवाय शरिरावर अतिरिक्त फॅट जमा होत नाही. दररोज कढीपत्ता ज्यूस किंवा चहा प्यायल्याने एनर्जी लेवल आणि मेटाबॉलिज्म दोन्ही वाढत असते. कढीपत्ता आपल्या शरिरातील कॅलरी लवकर नष्ट करतो.

चरबी कमी करण्यासाठी प्रभावी

कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत. कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतात. यात अल्कालोइड्स आहेत, ज्यात लठ्ठपणा आणि लिपिड कमी करणारे गुणधर्म आढळतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडची पातळीही कमी होते, ज्यामुळे वजन कमी होतं.
तसेच कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित केली जाते. 

घरी कसा बनवणार कढीपत्त्याचा ज्यूस 

  • कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळा. 
  • त्यानंतर थोड्यावेळाने गॅस जोरात करून पाण्यात एकदा उकळा.
  • यात आता मध आणि लिंबूचा रस टाकावा. 
  • आता ज्यूस किंवा चहा प्रमाणे गरमा गरम पिवून घ्या.
  • दररोज हा रस पिल्याने पाचन तंत्राचा बराच फायदा होतो.
  • रिकाम्या पोटी हा रस पिण्याचा प्रयत्न करा. तरच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी