दररोज इतकी पावले चालल्याने होईल वजन कमी, स्टडीमध्ये झाला खुलासा

तब्येत पाणी
Updated Oct 23, 2020 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

walking: नियमित चालण्याचे अनेक फायदे आपल्या शरीरास होतात. तुम्हाला जर रनिंग जमत नसेल तर चालण्याचा व्यायाम जरूर करावा. त्यासाठी घरातच तुम्ही चालू शकता.

walking
दररोज इतकी पावले चालल्याने होईल वजन कमी 

थोडं पण कामाचं

  • वजन कमी करण्यासाठी दररोज कमीत कमी १५००० स्टेप्स चालल्या पाहिजेत
  • १५००० स्टेप्स चालणे म्हणजे कमीत कमी दोन तास चालणे
  • चांगल्या आरोग्यासाठी(good health) दररोज एक हजार पावले चालणे गरजेचे आहे.

मुंबई: आपल्या आरोग्यासाठी चालणे(walking) खूप फायदेशीरआहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की चांगल्या आरोग्यासाठी(good health) दररोज एक हजार पावले चालणे गरजेचे आहे. दरम्यान, जे लोक चांगल्या आरोग्यासोबतच आपले वजन कमी करू इच्छितात(weight loss) त्यांनी जास्त मेहनत घेतली पाहिजे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे आहे तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की दररोज किती पावले चालले पाहिजे ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकेल. 

१००० पावले चालण्याची ही कॉन्सेप्ट कशी आली

१९६४मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये मार्केटिंगदरम्यान हा आकडा समोर आला. कँम्पेनमध्ये पॅडोमीटर मशीनच्या माध्यमातून फूट स्टेप मोजण्यात आले. यादरम्यान विविध स्टडीज समोर आल्या. ज्यात ५०००, ७००० आणि १०००० फूट स्टेप्सबाबत अभ्यास करण्यात आला. यातच तुम्हाला हे ही समजले असेल की ज्या फूट स्टेप्स जास्त ते चांगले. 

वजन कमी करण्यासाठी किती चालावे लागेल

एका नव्या संशोधनातून ही बाब समोर आली की वजन कमी करण्यासाठी दररोज कमीत कमी १५००० स्टेप्स चालल्या पाहिजेत. तुम्ही खरं तेच वाचलं आहे. २०१७च्या स्टडीनुसार दररोज १५००० पावले चालल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. हा स्टडी इंटरनॅशनल स्टडी जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झाला होता. या स्टडीमध्ये ऑफिस वर्कर आणि १५००० पावले चालणारा पोस्टमॅमवर अभ्यास करण्यात आला.

यात दिसले की रोज चालण्याने त्याचे बॉडी मास इंडेक्स, वेस्टलाईन आणि मेटाबॉलिज्म योग्य होते. या लोकांमध्ये हृदयाशीसंबंधित आजाराचा धोका कमी होता. तर दुसरीकडे जे लोक ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम करत होते त्यांचे वेस्टलाईन, बीएमआय, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल जास्त होते. 

दररोज १५००० स्टेप्स कसे चालाल

दररोज कमीत कमी १५००० स्टेप्स चाला.१५००० स्टेप्स चालणे म्हणजे कमीत कमी दोन तास चालणे. जर तुम्ही सलग दोन तास चालू शकत नसाल. तर अर्ध्या अर्ध्या तासाचे चार स्लॉट बनवा. तुम्ही उठल्यानंतर, जेवल्यानंतर, रात्रीचे जेवण केल्यानंतर तुम्ही चालू शकता. तुम्हाला असे चालणेही शक्य नसेल तर ऑफिस टाईममधून थोडा थोडा ब्रेक घ्या. दररोज १५००० स्टेप्स चालल्याने तुमच्या आरोग्यासोबतच तुमचे मेटाबॉलिज्म योग्य राहील. तसेच हळू हळू तुमचे वजन कमी होईल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी