Weight Loss: दररोज पाच मिनिटे वापरा या टिप्स, वजन कमी करण्यात होईल मदत

तब्येत पाणी
Updated Oct 12, 2020 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips: चुकीच्या पद्धतीचा आहार आणि कार्बोहायड्रेटमुळे वाढलेले वजन कमी करणे आता कठीण राहिलेले नाही. आपल्या जीवनशैलीत काही बदल केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकतो. 

weight loss
दररोज पाच मिनिटे वापरा या टिप्स, वजन कमी करण्यात होईल मदत 

मुंबई: लॉकडाऊनदरम्यान(lockdown) अनेक लोक घरी आहेत. यातच वजन वाढण्याची समस्या(weight gain) अनेकांना सतावत आहे. जर तुम्ही वेळेतच यावर लक्ष दिले तर वाढत्या वजनातून(weight loss) तुमची सुटका होऊ शकते. वजन कमी करणे हा खरंतर कठीण टास्क नाही मात्र योग्य जीवनशैली(lifestyle) आणि मार्गदर्शन केल्यास तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. तज्ञांच्या मते अनेकदा लहान बदलही आपल्या जीवनात मोठे प्रभावशाली ठरतात. तसेच काही लहान बदल केल्यास तुम्ही वजन घटवण्याचे लक्ष्य नक्कीच गाठू शकता. 

झोपण्याआधी नाश्त्याचा प्लान करा 

आपल्यासाठी वजन कमी करण्यासाठी नाश्ता सगळ्यात महत्त्वपूर्ण आहार असतो. यो्गय प्रमाणात नाश्ता घेतल्यास वजन कमी करण्यात मदत मिळू शकते. सकाळी उठल्यावर नाश्ता काय खायचा हे ठरवून त्रास होण्यापेक्षा रात्रीच नाश्त्यासाठी योग्य प्लान बनवावा. नाश्त्यामध्ये नेहमी व्हिटामिन आणि प्रोटीन्सचा समावेश असावा. तुम्ही नाश्त्यात एखाद्या फळाचा ज्यूस अथवा अंडे खाऊ शकता.

वर्कआऊटच्या आधी घ्या कॉफी

अनेक फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध सेलिब्रेटी कॉफीला प्री वर्कआऊट ड्रिंक म्हणून घेतात. कॉफीमुळे तुम्हाला वर्कआऊट करताना एनर्जी मिळते. तसेच तुम्ही एखाद्या पदार्थासाठी क्रेव्हिंगही थांबवू शकता. यामुळे कॅलरीज कमी होतात. तसेच वजन घटवणे फायदेशीर ठरते. कॉफीमध्ये कॅफेन असते ज्यामुळे एनर्जी मिळते. 

वेळ मिळाल्यास वॉक करा

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी रनिंग आणि हेवी वर्कआऊट करतात. मात्र असे करू नये. तुम्ही सकाळच्या वेळेस अथवा वेळ मिळेल तेव्हा वॉक करू शकता. तसेच तुम्हाला वॉक करण्यासाठी कोणत्याही मैदान अथवा पार्कमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातही कामाच्या दरम्यान ब्रेक घेत वॉक करू शकता. तसेच घरातल्या घरात चालून तुम्ही वजन कमी करू शकता. 

सोशल मीडियाचा योग्य वापर

अनेकदा लोक आपल्या सकाळची सुरूवात सोशल मीडिया फीडच्या माध्यमाने करतात. तसेच या फोनचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. तुम्ही सोशल मीडियाचा वापर वजन घटवण्यासाठी करू शकता. फिटनेससंबंधित पोस्ट वाचा. फिटनेस फ्रीक लोकांना फॉलो करा. ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. तसेच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी