Corona Cases Mumbai | मुंबई : कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेनंतर ही महासाथी संपते असे वाटत होते, मात्र हा विषाणू अद्याप संपला नाही. कोरोना व्हायरस पुन्हा एकदा हळूहळू आपले पाय पसरत आहे. युरोप आणि आशियातील देशांमध्ये रूग्ण वाढत आहेत. शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की कोरोनाची चौथी लाट लवकरच इतर प्रमुख शहरांमध्ये ठोठावू शकते. ज्याला ओमिक्रॉनचा व्हेरिएंट बीए.२ (Omicron BA.2) जबाबदार आहे. (Danger your teeth in the fourth wave of the corona Don't ignore these 6 symptoms).
अधिक वाचा : IPL 2022:एकच सामना खेळून संपले CSKच्या स्टार खेळाडूचे करिअर!
कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने श्वसनाचा आजार आहे जो फुफ्फुसांना नुकसान पोहचवतो. यामुळे खूप ताप, खोकला आणि घसा खवखवणे ही लक्षणे जाणवू लागतात. परंतु आता हा विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये कहर करत आहे. कोविड-१९ मुळे दात आणि हिरड्यांचेही नुकसान होत आहे, ज्याची लक्षणे हल्ली दिसून येत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्याला कोविड टीथ (Covid Teeth) असे नाव दिले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेपूर्वी ही लक्षणे समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोरोना व्हायरसची लक्षणे आणि दातांचे आरोग्य यांच्यात मजबूत संबंध आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोविड-१९ मुळे दातांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोरोनाग्रस्त ७५ टक्के रुग्णांमध्ये दातांच्या समस्या आढळून आल्या आहेत.
अधिक वाचा : मुंबईत बाईक-टॅक्सी सेवा परमिशन
कोरोनाच्या व्हायरसच्या लक्षणांवर केलेल्या ५४ अभ्यासांच्या अहवालात या गंभीर आजाराच्या प्रमुख १२ लक्षणांमध्ये तोंडाशी संबंधित कोणतीही चिन्हे नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये ताप (८१.२ टक्के), खोकला (५८.५ टक्के) आणि थकवा (३८.५ टक्के) ही सर्वात सामान्य लक्षणे होती.
दातांशी संबंधित कोरोनाची गंभीर लक्षणे
जेव्हा हा विषाणू दातांच्या आरोग्यावर परिणाम करतो तेव्हा कोरोना व्हायरसची काही लक्षणे तोंडात दिसून येतात. अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांना दाखवून कोविड-१९ चाचणी करून घ्या.
१) हिरड्यांमध्ये वेदना
२) जबडा किंवा दात दुखणे
३) हिरड्यांमध्ये रक्ताची गाठ
४) ताप
५) खोकला
६) थकवा
दात किंवा हिरड्यांचे दुखणे कोणालाही त्रास देऊ शकते, ज्यामुळे आपल्या रोजच्या दिनक्रमात बाधा येते. अशा परिस्थितीत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. वेदना कमी करण्यासाठी, एसिटामिनोफेनऐवजी ४०० मिलीग्रॅम आयबुप्रोफेन घेणे अधिक प्रभावी ठरू शकते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.