Day Snoring : सावधान! दिवसा घोरणे तुम्हाला बनवू शकते आंधळे, समोर आले नवे संशोधन... लाखो लोकांना धोका!

Snoring : पूर्वी घोरण्याचा संबंध वय वाढण्याशी असे मात्र आता तरुणदेखील घोरू लागले आहेत. घोरणे आणि झोप यांचा थेट संबंध आहे. अनेकदा डॉक्टर रात्री 6-8 तासांची झोप (Sleep)घेण्याचा सल्ला देतात. अनेकजण रात्रीच्या झोपेची भरपाई दिवसा झोपून काढतात. मात्र दिवसा झोपणे आणि घोरणे याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. जर स्थिती अधिक गंभीर असेल तर समस्या अंधत्वापर्यंत (Blindness) वाढू शकते.

Snoring
घोरणे 
थोडं पण कामाचं
  • घोरण्याची अनेक कारणे असतात
  • घोरणे आणि झोप यांचा थेट संबंध
  • दिवसा झोपणे आणि घोरणे याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.

Blindness due to Day Snoring : नवी दिल्ली : घोरणे ही समस्या जगभरात सर्वत्र आढळते. घरात जर घोरणारी व्यक्ती असेल तर इतरजण त्याच्या घोरण्यामुळे (Snoring) त्रस्त झालेले असतात. घोरण्याची अनेक कारणे असतात. पूर्वी घोरण्याचा संबंध वय वाढण्याशी असे मात्र आता तरुणदेखील घोरू लागले आहेत. घोरणे आणि झोप यांचा थेट संबंध आहे. अनेकदा डॉक्टर रात्री 6-8 तासांची झोप (Sleep)घेण्याचा सल्ला देतात. चांगली झोप अनेक बाबींवर अवलंबून असते. रात्रीची चांगली झोप तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश ठेवते. मात्र रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने दिवसा झोप येते. अनेकजण रात्रीच्या झोपेची भरपाई दिवसा झोपून काढतात. मात्र दिवसा झोपणे आणि घोरणे याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. जर स्थिती अधिक गंभीर असेल तर समस्या अंधत्वापर्यंत (Blindness) वाढू शकते. नवीन संशोधनातून ही बाब समोर आली आहे. याचा लाखो लोकांना धोका आहे. (Day snoring can make you blind, new research suggests)

अधिक वाचा : प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम

घोरण्यामुळे अंधत्व-

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, रात्री झोप न लागणे आणि दिवसा घोरणे ही समस्या दीर्घकाळ वाढल्यास काचबिंदू अर्थात काळे मोतीबिंदू होण्याचा धोका वाढतो. महत्त्वाचे म्हणजे या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास अंधत्व म्हणजेच अंधत्व येण्याचा धोका असतो. एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, काचबिंदूमुळे दृष्टी गेली तर ती परत येत नाही. रात्री पुरेशी झोप न घेतल्यास कोणत्याही वयोगटातील लोकांना काचबिंदू होण्याचा धोका असतो. असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. ही समस्या वृद्ध पुरुष आणि धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सामान्य आहे.

ब्रिटनच्या बायोबँकने केलेल्या या संशोधन अभ्यासात 40 ते 69 वर्षे वयोगटातील 4 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास केल्यानंतर समोर आलेल्या माहितीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्यात आले. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना त्यांच्या झोपण्याच्या सवयींबद्दल विचारण्यात आले. 2010 ते 2021 या कालावधीत हा अभ्यास झाला. या अभ्यासादरम्यान, 8,690 लोकांमध्ये काचबिंदू आढळून आला.

अधिक वाचा : आलिया-रणबीरला 'मुलगी झाली हो'

काचबिंदूचा धोका

अभ्यासाच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले की जे लोक घोरतात आणि दिवसा भरपूर झोप घेतात त्यांना काचबिंदूचा धोका 11 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, निद्रानाश आणि कमी किंवा दीर्घ झोप असलेल्यांमध्ये हा धोका 13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2040 पर्यंत जगभरात 11.2 कोटी लोक काचबिंदूने ग्रसित होण्याची भीती आहे.

अधिक वाचा : भारतीय नोटांवर किती भाषा?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. झोप न मिळाल्यास आपली शिकण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, आपला स्वभाव/वर्तणूक आणि आपल्या स्मरणशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो. काचबिंदू डोळ्याला मेंदूशी जोडणाऱ्या ऑप्टिक नर्व्हवर विपरित परिणाम करतो. यामुळे डोळ्याच्या पेशींचे नुकसान होते. जर योग्य उपचार वेळीच केले नाहीत तर अंधत्व येते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी