भारतातील प्रथम सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस HPV ला DCGI ची मान्यता, कधी होणार उपलब्ध?

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Indian Cervical Cancer Vaccine) मृत्यू होतो. महिलांवरील या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगाची लस भारतातच बनवली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ही लस तयार केली जाणार आहे. 

The cervical cancer vaccine HPV will be developed in India
सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस HPV भारतात होणार तयार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 8 जून रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल मान्यतेसाठी अर्ज करण्यात आला होता.
  • महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रथमच भारतीय HPV लस बनवली जाईल.- पुनावाला

Cervical Cancer Vaccine : भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Indian Cervical Cancer Vaccine) मृत्यू होतो. महिलांवरील या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगाची लस भारतातच बनवली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ही लस तयार केली जाणार आहे. 

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे महिलांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. SII चे सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक, प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जून रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांच्याकडे  HPV लसीच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृततेसाठी अर्ज केला होता. त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. 

Read Also: अशोक स्तंभावरील आक्रमक सिंह पाहून राजकीय नेते झाले आक्रमक

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला ही लस तयार करण्यास मान्यता दिल्यानंतर आत भारतातील पहिल्या क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (qHPV) चे उत्पादन सुरू होईल आणि लवकरच जनसामान्यांना परवडणारी ही लस बाजारात उपलब्ध होईल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रथमच भारतीय HPV लस बनवली जाईल, जी स्वस्त आणि सहज उपलब्ध असेल. आम्ही या वर्षाच्या शेवटी ते लॉन्च करण्यास उत्सुक आहोत, तसेच आम्ही DCGI चे आभार मानतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी