लक्षणं दिसण्यापूर्वी पसरतो घातक कोरोना व्हायरस, वैज्ञानिकांचा दावा

एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसण्याची त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत विषाणूचं संक्रमण सुरु होतं असं एका संशोधनात म्हटलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

deadly corona virus spreads before symptoms appear scientific research reveals
लक्षणं दिसण्यापूर्वी पसरतो घातक कोरोना व्हायरस, वैज्ञानिकांचा दावा  |  फोटो सौजन्य: AP, File Image

ह्यूस्टनः कोरोना व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असे आढळले आहे, की  एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी लागतो. जवळपास १० टक्के रुग्णांमध्ये हा संसर्ग अशा व्यक्तीकडून होतो की, ज्याला कोरोनाची कोणती लक्षणे देखील दिसून आलेली नसतात. हे एक असं संशोधन आहे की, जे सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना साथीचा रोग आटोक्यात आणण्यास मदत करू शकतो.

टेक्सास विद्यापीठासह इतर विद्यापीठांच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण ही एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्यास साधारणतः चार दिवस लागतात. 

त्यांचं असं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरस पसरण्याची  गती ही दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक व्यक्ती किती लोकांना संक्रमित करतो आणि दुसरा इतर सर्व लोकांमध्ये पसरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पहिल्या स्थितीला  प्रतिकृती क्रमांक आणि दुसर्‍या स्थितीला सतत मध्यांतर म्हणतात. कोरोना विषाणूमुळे होणारा आजार कोविड-१९ चा सतत मध्यांतर कमी असल्याने संक्रमित होण्याचा वेग वाढत आहे. ज्यामुळे ते रोखणं कठीण आहे. 

टेक्सास युनिव्हर्सिटीचे सह-संशोधक लॉरेन एन्सेल मेयर्स म्हणाले, "इबोलाचा सतत मध्यांतर हा काही आठवडे होता, जो काही दिवसांचा अंतर असणाऱ्या इन्फ्लूएंझाच्या मदतीने रोखणे सोपे आहे." मेयर्स म्हणाले, डेटावरून असे सूचित होते की कोरोना विषाणू फ्लूसारखा पसरू शकतो आणि याचाच अर्थ असा आहे की वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आपल्याला वेगवान आणि आक्रमकतेने पुढे गेलं पाहिजे. 'इमर्जिंग इन्फेक्टीव्ह डिसिसीज' जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे.

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ११० पर्यंत वाढली आहे. तर यामुळे २ लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत १३ जणं बरेही झाले आहेत. जगभरात १,७०,००० पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. यापैकी ६,५०० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. तर ७७००० पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...