Quick Sleep Trick: फक्त २ मिनिटात येईल गाढ झोप; जाणून घ्या मनगटाची ही खास युक्ती

तब्येत पाणी
Updated Jun 24, 2022 | 10:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Quick Sleep Trick In Marathi | बिछान्यावर गेल्याबरोबर लगेचच गाढ झोप यावी असे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना रात्री झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Deep sleep will come in just 2 minutes, Learn this special wrist trick
फक्त २ मिनिटात येईल गाढ झोप, जाणून घ्या खास युक्ती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फक्त २ मिनिटात येणार गाढ झोप.
  • मनगटाच्या खास युक्तीची सर्वत्र चर्चा.
  • टिकटॉकवर एका युजरने झोपेच्या नवीन ट्रिकबद्दल सांगितले आहे.

Quick Sleep Trick In Marathi | मुंबई : बिछान्यावर गेल्याबरोबर लगेचच गाढ झोप यावी असे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना रात्री झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. प्रामुख्याने जास्त थकव्यामुळे झोप अगदी सहज येते पण काही लोकांच्या बाबतीत असे होत नाही. काही लोक असेही आहेत जे झोप येण्यासाठी औषधांची मदत घेतात. दरम्यान सोशल मीडियावर झोप येण्यासाठीची एक युक्ती चांगलीच व्हायरल होत आहे. याबाबात दावा केला जात आहे की या युक्तीचा वापर केल्यास बिछान्यावर गेल्यावर फक्त २ मिनिटात गाढ झोप येईल. (Deep sleep will come in just 2 minutes, Learn this special wrist trick). 

अधिक वाचा : जुलैच्या सुरूवातीला बुध बदलणार चाल, या लोकांना होणार फायदा

टिकटॉकवरील युक्ती वेधते सर्वांचे लक्ष 

टिकटॉकवर एका युजरने झोपेच्या नवीन ट्रिकबद्दल सांगितले आहे. या युजरचे Tiktok वर youngeryoudoc नावाचे अकाउंट आहे. या व्यक्तीच्या व्हिडीओला आतापर्यंत २५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्यक्तीने सांगितले की, मनगटावरील विशिष्ट जागा चोळल्याने तुम्हाला क्षणातच झोप येऊ शकते. काही मिनिटे असे केल्याने तुम्हाला गाढ झोप लागेल, असा दावा त्या व्यक्तीने केला आहे. व्हिडीओमध्ये झोप येण्यासाठी, या व्यक्तीने आपल्या मनगटाच्या आतील बाजूच्या पल्स पॉईंटला वर्तुळाकार हालचालीत २ ते ३ मिनिटे मालिश करण्याबद्दल सांगितले आहे. टिकटॉकवरील ही २ मिनिटांची झोपेची युक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लक्षणीय बाब म्हणजे नाडी बिंदू हा मनगटाच्या आतील बाजूस एक एक्यूप्रेशर बिंदू आहे. जेव्हा तुम्ही या जागेवर हलक्या हातांनी दाबता किंवा चोळता तेव्हा तुमचे मन शांत होते. पारंपारिक चिनी औषधांमध्ये, मनगटाच्या या भागाला शेन मेन म्हणतात. ज्याला मराठीमध्ये 'आत्म्याचा दरवाजा' असे म्हटले जाते. 

Sleep Trick

२०१० आणि २०१५ मध्ये केलेल्या दोन वेगळ्या अभ्यासांमध्ये असे दिसून आले की, लोकांच्या मनगटाच्या नाडीच्या बिंदूंमध्ये मालिश करण्यात आली, ज्याचे परिणाम खूप चांगले होते. या सर्व लोकांच्या झोपेचा दर्जा सुधारला आणि झोपेच्या विकाराची समस्याही बऱ्याच अंशी कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले. या दरम्यान लोकांच्या झोपेची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले. या अभ्यासात सामील असलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा देखील सुधारला गेला आणि जे लोक झोपेसाठी औषधे वापरतात त्यांच्यातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली.

ही युक्ती करण्यापूर्वी ही काळजी घ्या

मात्र, संशोधकांचे असे देखील म्हणणे आहे की हा अभ्यास खूपच लहान होता, ज्यामध्ये झोपेची समस्या असलेल्या लोकांना याचा फायदा होईल की नाही हे शोधणे खूप कठीण आहे. तसेच तुम्ही स्वतःहून तुमच्या मनगटाची मसाज केली तर ते फायदेशीर आहे की नाही हे सिद्ध होईल. अशा परिस्थितीत या बाबींवरही संशोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी आपण एखाद्या तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी