Dengue: डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ...असा करा बचाव

Health tips : सध्या डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी समस्या उद्भवू शकते. डासांमुळे पसरणारा डेंग्यू संपूर्ण शरीर कमकुवत करतो. डेंग्यू झाल्यानंतरची सर्व धावपळ टाळायची असेल तर डेंग्यूवर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागते.

Prevention From Dengue
डेंग्यूपासून संरक्षण 
थोडं पण कामाचं
  • डेंग्यूंच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
  • डेंग्यू होण्यामागची कारणे जाणून घ्या
  • असा करा स्वत:चा बचाव

Prevention From Dengue:नवी दिल्ली : पावसाळा संपून हिवाळ्याची सुरूवात होते आहे. अशा ऋतू बदलाच्या काळात अनेक आजारांचा किंवा संसर्गाचा प्रादूर्भाव होत असतो. असाच एक आजार म्हणजे डेंग्यू. सध्या डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी समस्या उद्भवू शकते. डासांमुळे पसरणारा डेंग्यू संपूर्ण शरीर कमकुवत करतो. काही लोक वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने डेंग्यूमुळे आपला जीवदेखील गमावतात. अनेकांना डेंग्यूची लक्षणे (Symptoms of Dengue) माहीत नसतात. त्यामुळे डेंग्यूपासून बचाव करणे केव्हाही चांगले. डेंग्यूपासून वाचण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल ते जाणून घेऊया. (Dengue patients are rising, do this preventive measures)

अधिक वाचा : पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग, झटक्यात व्हाल मालामाल

डेंग्यूची लक्षणे कोणती-

  1. डोकेदुखी आणि सांधेदुखी
  2. थंडी वाजून जास्त ताप येणे हे डेंग्यूचे लक्षण असू शकते.
  3. घसा आणि डोळे दुखणे
  4. भूक न लागणे
  5. लाल पुरळ

अधिक वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी करावे लग्न?

डेंग्यू कसा टाळावा

डेंग्यू झाल्यानंतरची सर्व धावपळ टाळायची असेल तर डेंग्यूवर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागते. प्रतिबंधात्मक उपाय अगोदरच अवलंबले तर डेंग्यू टाळता येऊ शकतो. डेंग्यूचा प्रादूर्भाव डासांमुळे होतो. त्यामुळे डासांची वाढ रोखणे आवश्यक असते. डेंग्यूच्या डासांची पैदास पाण्यात होते. त्यामुळे या डासांच्या उत्पत्तीचा धोका असलेल्या ठिकाणी पाणी साचू देऊ नका. खास करून कूलरमध्ये किंवा अशा कोणत्याही खड्ड्यात पाणी साचू देऊ नका.

डासांपासून संरक्षण

डास चावणार नाहीत याची काळजी घ्या. डास टाळण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा. तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाय करा. कारण डेंग्यूचे डास रात्री जास्त सक्रिय असतात.

घरात किंवा आजूबाजूला साचलेले पाणी काढणे शक्य नसेल तर त्यात पेट्रोल किंवा रॉकेल फवारावे जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही.

शरीर झाकून ठेवा. पूर्ण कपडे घालणे चांगले, अन्यथा डास त्वचेच्या थेट संपर्कात येतो. मॉस्किटो रिपेलेंट लोशन लावून डासांपासून संरक्षण मिळवा.

अधिक वाचा - आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

डेंग्यूला तोंड देण्यासाठी तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवा. कारण डेंग्यूमध्ये याच्यावर हल्ला होतो. या आजारात प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे प्लेटलेट्स बनण्यास मदत होईल अशा गोष्टी खा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचे सेवन सुरू करा. डेंग्यूशी लढण्यासाठी पपईचा रस फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर आहारावर लक्ष द्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही हलगर्जीपणा करू नका. डेंग्यूची लक्षणे दिसल्यावरदेखील काही लोक उपचारासाठी टाळाटाळ करतात आणि परिणामी परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी