Ghee For Glowing Skin: रोज एक चमचा देसी तूप चमकदार त्वचेसाठी फायदेशीर, या टिप्स करा फॉलो

तब्येत पाणी
Updated Mar 24, 2023 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ghee Health Benefits,: तुपाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की चेहऱ्यावर तुपाचा वापर केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुपामध्ये पाणी, ऊर्जा, व्हिटॅमिन ए, कॅलरीज इत्यादी असतात जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

रोज एक चमचा देसी तूप चमकदार त्वचेसाठी फायदेशीर
Desi Ghee beneficial for glowing skin, follow these tips  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्किन केअर रूटीनचा फॉर्म्युला
  • झोप येण्यासाठी तूप फायदेशीर
  • तुमच्या चेहऱ्यावरील डाग हलके होऊ लागतील.

Ghee for Skin Care : स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण आपल्या त्वचेच्या निगाबाबत अत्यंत जागरूक असतो. वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा सुंदर दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजन आपली त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु कधीकधी या पद्धती त्वचेला हानी पोहोचवू शकतात आणि त्वचेचे नुकसान करू शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्किन केअर रूटीनचा असा एक फॉर्म्युला सांगणार आहोत, जो तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातच असतो. 

तुपाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की चेहऱ्यावर तुपाचा वापर केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुपामध्ये पाणी, ऊर्जा, व्हिटॅमिन ए, कॅलरीज इत्यादी असतात जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर तुप लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. विशेषत: रात्री तूप लावून झोपल्याने चेहऱ्याच्या टेक्‍चरवरही परिणाम होतो. 

अधिक वाचा: Lemon For Uric Acid : युरिक अ‍ॅसिडची लेवल मेंटेन ठेवण्याचे काम करते लिंबू पाणी
 
देशी तुपाचे फायदे
1. त्वचेला मऊ आणि हायड्रेट करण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.
२. देशी तूप वापरून तुम्ही नैसर्गिक चमक मिळवू शकता. यासोबतच काळे डागही हलके होतात.
3. खराब झालेली त्वचेवर तूप लावा यामुळे इंनफेक्शन कमी होईल. 
4. तूप डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि ते डोळ्याच्या लहान जखमा भरून काढू शकते.
5. तूप वापरून डोळ्याखालची काळी वर्तुळे दूर करू शकता.

अधिक वाचा: Weight Loss Diet: नवरात्रीच्या उपवासातील 4 पदार्थ जे वजन कमी करण्यासाठी करतील सहाय्य 
तूप कसे वापरावे
तूप वापरण्यासाठी तुम्हाला काही विशेष करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त गरम पाण्यात तूप मिसळून प्यावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका.  तुम्ही घरी बनवलेले तूप वापरावे कारण चेहऱ्यावर चमक येण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी तूप फायदेशीर मानले जाते. 

झोपण्यापूर्वी तूप कसे वापरावे
तूप वापरण्यासाठी इतर घटकांची गरज भासणार नाही कारण तूपात एंटी-एजिंग गुणधर्म असतात. तुमचा चेहरा तरुण बनवण्यासाठी तुम्हाला फक्त घरगुती तूप वापरायचे आहे आणि खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • फ्रीजमधून तूप काढून ठेवा.
  • आपले दोन्ही हात स्वच्छ धुवा.
  • तुपाचे 5 थेंब घेऊन चेहऱ्याला लावा.
  • हलक्या हातांनी मसाज करा आणि झोपा.
  • सकाळी चेहरा धुवा.

अधिक वाचा: Health Tips for breakfast : नाश्त्यामध्ये काय योग्य कॉर्नफ्लॅक्स् की पराठा ? जाणून घेऊयात

पुरळ येणार नाही
यासाठी तुम्हाला 1 चमचा तूप 1 चमचा दह्यामध्ये मिसळून चेहऱ्याला नियमित लावावे लागेल. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग हलके होऊ लागतील आणि त्वचेचा रंगही उजळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी