Ghee in Diseases : या तीन आजारांमध्ये तुपाचे सेवन असते विषासमान...पाहा नेमके काय करावे

Health Tips : देशी तुपाच्या सेवनाने आरोग्याला (Health) फायदा होतो. यामुळे जेवणाची चवही वाढते. रोज तूप खाल्ल्याने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. देशी तुपाच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. सर्व ऋतूत याचे सेवन उपयुक्त असते मग तो उन्हाळा असो हिवाळ्यात तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. असे असले तरी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तुपाचे सेवन केल्याने काही लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

Ghee
तूप 
थोडं पण कामाचं
  • भारतीय आहारात तुपाचे मोठे महत्त्व
  • तुपामध्ये अनेक पोषक घटक असतात
  • काही आजारांमध्ये तूप टाळले पाहिजे

Diseases in which Ghee to be avoided :नवी दिल्ली : देशी तुपाचे (Desi Ghee) महत्त्व भारतीय स्वयंपाकघरात मोठे आहे. आयुर्वेदातदेखील (Ayurveda) याचे औषधी महत्त्व सांगितले आहे. शिवाय देशी तुपाच्या सेवनाने आरोग्याला (Health) फायदा होतो. यामुळे जेवणाची चवही वाढते. रोज तूप खाल्ल्याने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. देशी तुपाच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तेलाऐवजी तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. इतर पौष्टिक घटक मिळतात. व्हिटॅमिन ई युक्त तुपाचे सेवन त्वचेसोबतच आरोग्यालादेखील फायद्याचे असते. आता अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन ई समृध्द तुपात महत्वाचे अँटिऑक्सिडेंट असतात. या घटकांचा फायदा कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास होतो. मात्र काही आजार आहेत ज्यात देशी तुप अपायकारक ठरू शकते. यासंदर्भात विस्ताराने जाणून घेऊया.(Desi Ghee may work as poison for these 3 Diseases)

अधिक वाचा : D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई

तज्ज्ञांच्या मते आयुर्वेदात तूप हे औषध मानले जाते. सर्व ऋतूत याचे सेवन उपयुक्त असते मग तो उन्हाळा असो हिवाळ्यात तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. त्यात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के, ई असे अनेक पोषक घटक असतात. आरोग्यासाठी, तंदुरुस्तीसाठी हे घटक फारच महत्त्वाचे असतात. मात्र त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तुपाचे सेवन केल्याने काही लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.  कोणासाठी तुपाचे सेवन विषासारखे ठरू शकते ते पाहूया.

पचन कमकुवत असल्यास तूप टाळा

शरीरात पोषक घटकांचा फायदा होण्यासाठी आपली पचनशक्ती खूप महत्त्वाची ठरते. मात्र ज्यांची पचनशक्ती चांगली नसते, त्यांनी तूप खाणे टाळावे. कारण जर पचनच व्यवस्थित होत नसेल तर पौष्टिक बाबी खाल्ल्याने अपायच होऊ शकतो. गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जर तुपाचे सेवन केले तर त्यांच्या समस्या वाढतात. म्हणूनच तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्ही मर्यादित प्रमाणात तुपाचे सेवन करावे किंवा टाळावे.

अधिक वाचा- भारतातील या शहरात पहिल्यांदा दिसणार चंद्रग्रहण, जाणून घ्या इतर शहरांमधील ग्रहणाची वेळ

लीव्हरचा आजार असलेल्यांनी तुप टाळावे 

लीव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पचनात त्याची भूमिका मोठी असते. मात्र ज्या लोकांना यकृताची समस्या आहे त्यांच्यासाठी तुपाचे सेवन विषासारखे काम करते. लीव्हरचा आजार असल्यास त्याची क्षमता कमी होते आणि पचनावर परिणाम होतो. एरवी लीव्हर म्हणजे यकृत अन्न पचण्यास मदत करते. मात्र यकृत खराब होऊ लागले तर तूप पचणे अवघड होऊन बसते. परिणामी फायद्याऐवजी तोटाच होतो. शिवाय लीव्हरचेही नुकसान होते. लिव्हर सिरोसिस, स्प्लेनोमेगाली, हिपॅटोमेगाली, हिपॅटायटीसच्या रुग्णांनी तूप खाणे टाळले पाहिजे.

अधिक वाचा :  Biden on Elon Musk : इलॉन मस्कवर संतापले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन...ट्विटरच्या खोटारडेपणावर ठेवले बोट

गरोदरपणात तूप नुकसान करू शकते

गरोदर महिलांनी खाण्यापिण्याची खास काळजी घेण्याची गरज असते. त्यातच गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन झपाट्याने वाढते. परिणामी तुपाचे सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. तूप खाल्ल्याने महिलांचे वजन जास्त प्रमाणात वाढण्याची भीती असते. यातून गरोदरपणात लठ्ठपणासह अनेक आजारांचा धोकाही वाढतो. म्हणूनच महिलांनी गरोदरपणात तूप खाणे टाळावे. खाल्ले तरी वैद्यकीय सल्ल्याने सेवन करावे.

हे लक्षात ठेवा

पचनाशी निगडीत किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तूप खाणे टाळावे. फॅटी ऍसिडस् युक्त तुपाचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून तूप ऐरवी फायद्याचे असले तरी ते खाताना काही गोष्टींची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी