Health Tips। मुंबई : उन्हाळ्यात अशा अनेक भाज्या असतात ज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे तोंडलीची भाजी. तोंडलीची भाजी खाणे हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. खासकरून डायबिटीजच्या रुग्णांनी तोंडलीची भाजी जरूर खावावी. ही भाजी पांढऱ्या रंगाच्या फुलांपासून बनवली जाते. तोंडली बेलाच्या झाडावर येणाऱ्या फळांसारखी दिसतात त्यांचा रंग हिरवा असतो. तोंडलीची भाजी खायला खूप चविष्ट असते. हृदय आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही डायबिटीजचे रूग्ण असाल तर तोंडलीच्या भाजीचा आहारात नक्की समावेश करा. (Diabetes sufferers must eat kundru vegetable).
अधिक वाचा : सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचू शकते गुजरात टीम!
तोंडलीमध्ये असे अनेक व्हिटॅमिन आणि पोषक घटक आहेत, जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. तोंडलीमध्ये व्हिटॅमिन मिनरल्स, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
अधिक वाचा : राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर
डिस्क्लेमर : तुमचे आरोग्य आमच्यासाठी खूप बहुमूल्य आहे. वरील दिलेल्या गोष्टी तज्ज्ञानी सांगितलेल्या आहेत, टाइम्स नाऊ मराठी यात एक्स्पर्ट नाही. कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.