Diabetes | नेमके काय असते मधुमेहाचे कारण, लक्षणे आणि कसा ठेवायचा नियंत्रणात

Diabetes | इंटरनॅशनल डायबेटीज फेडरेशनच्या २०१७च्या अहवालानुसार भारतात जवळपास ७.२९ कोटी लोक मधुमेहाने पीडित आहेत. अर्थात अलीकडच्या काळात जीवनशैलीत बदल झाल्याने तरुणवर्गात देखील मधुमेह वेगाने वाढतो आहे. मात्र तरुणांमध्ये या आजाराची वाढ १० टक्क्यांपर्यतच पाहण्यात आली आहे. मागील वर्षी डॉक्टरांना तरुण रुग्णांच्या (३० ते ५० वर्षे) संख्येत वाढ दिसून आली आहे. भारतात तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढण्याचे मुख्य कारण जीवनशैलीत झालेला धोकादायक बदल हे आहे.

How to control Diabetes
मधुमेह कारणे आणि नियंत्रण 
थोडं पण कामाचं
  • भारतातील मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ
  • अलीकडच्या काळात जीवनशैलीत बदल झाल्याने तरुणवर्गात देखील मधुमेह वेगाने वाढ
  • वजन वाढणे, शारीरिक काम कमी करणे, फास्ट फूड खाणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या

Diabetes | नवी दिल्ली : जगभरातून मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. विशेषत: भारतातील मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होते आहे. त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानीदेखील (Global Capital of Diabetes) म्हटले जाते. हा आजार रक्तातील साखरेचे (Blood Sugar level) प्रमाण वाढल्याने आणि शरीरात इन्सुलिन (Insulin) हॉर्मोन न तयार झाल्याने होतो. एकदा मधुमेह झाल्यानंतर तो आयुष्यभर सोबत राहतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिवाय गोड पदार्थ खास करून ज्यात साखरेचा वापर केलेला असतो, ते टाळले पाहिजेत. मधुमेहाच्या आजाराचे मुख्य कारण काय? आणि याला नियंत्रणात कसे ठेवायचे ते पाहूया. (Diabetes : What causes the diabetes? how to control it?)

मधुमेहाची कारणे

तज्ज्ञांच्या मते मुधमेहाच्या बाबतीत इंटरनॅशनल डायबेटीज फेडरेशनच्या २०१७च्या अहवालानुसार भारतात जवळपास ७.२९ कोटी लोक मधुमेहाने पीडित आहेत. अर्थात अलीकडच्या काळात जीवनशैलीत बदल झाल्याने तरुणवर्गात देखील मधुमेह वेगाने वाढतो आहे. मात्र तरुणांमध्ये या आजाराची वाढ १० टक्क्यांपर्यतच पाहण्यात आली आहे. मागील वर्षी डॉक्टरांना तरुण रुग्णांच्या (३० ते ५० वर्षे) संख्येत वाढ दिसून आली आहे. भारतात तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढण्याचे मुख्य कारण जीवनशैलीत झालेला धोकादायक बदल हे आहे. या बदलामुळे खाण्यापिण्याच्या पॅटर्नमध्ये बदल झाले आहेत. त्याचबरोबर वजन वाढणे, शारीरिक काम कमी करणे, फास्ट फूड खाणे इत्यादी बाबी आहेत. याचबरोबर उशीरा निदान केल्यानेदेखील मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात मधुमेह होतो आहे.

टाइप २ चे वाढते प्रमाण

तज्ज्ञांच्या मते मधुमेहाची समस्या ही धोकादायक पद्धतीने वाढते आहे. बहुतांश रुग्णांना हे माहितच नसते की त्यांना मधुमेह आहे. त्यामुळे अशा रुग्णांपर्यत पोचण्यासाठी बरेचसे कॅम्प किंवा शिबिरांचे आयोजन करावे लागते. ज्या रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांना ही गोष्ट माहितच नाही अशांची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये बहुतांश लोक टाइप २ मधुमेहाने ग्रस्त आहेत.

कसा ठेवायचा नियंत्रणात

मधुमेह हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. भारतात जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गर्भावस्थेच्या काळातील मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. जीवनशैलीत बदल करणे हा मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वजन नियंत्रणात ठेवणे, किमान ३० मिनिटे व्यायाम करणे, शारीरिक हालचाली करत राहणे, कमी गोड आणि सॅच्युरेटेड अन्न टाळणे, तंबाखू, सिगारेट आणि दारू टाळणे. यामुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येते.

अलीकडच्या काळात व्यायामाचा अभाव आणि फास्टफूड खाणे हा जीवनशैलीचा अभाव झाला आहे. फक्त एका क्लिकवर अनेक गोष्टी होत असल्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याचे दूरगामी परिणाम होतात. त्यातच खाण्यावर नियंत्रण नसणे, कधीही काहीह खाणे याचा देखील आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी