Custard Apple Benefits: Diabetes रुग्ण पोटभर खाऊ शकतात सीताफळ, फक्त एक गोष्ट ठेवा लक्षात

Custard Apple Benifits: जाणून घ्या सीताफळाचे नेमके किती फायदे आहेत. तसेच मधुमेहाचे रुग्ण सीताफळाचे कसे सेवन करु शकतात.

diabetic patients can eat custard apple just take care of this
Diabetes रुग्ण पोटभर खाऊ शकतात सीताफळ, फक्त एक गोष्ट ठेवा लक्षात 
थोडं पण कामाचं
  • सीताफळ आहे खूपच गुणकारी
  • मधुमेहाचे रुग्ण देखील करु शकतात सीताफळाचे सेवन
  • सीताफळाप्रमाणेच त्याचे झाडंही आहे खूप उपयुक्त

Custard Apple: कस्टर्ड अ‍ॅपलला (Custard Apple) भारतात सीताफळ आणि शरीफा म्हणूनही ओळखले जाते. सीताफळच वापर आयुर्वेदातही फार पूर्वीपासून होत आहे. सीताफळच्या अनेक फायद्यांबद्दल अनेक अभ्यासात सांगण्यात आले आहे. सीताफळ हे जितके फायदेशीर आहे, तितकीच त्याच्या झाडाची पाने, मूळ आणि साल देखील फायदेशीर आहे. हे अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते. हे फळ बाहेरून कडक दिसत असले तरी आतून अतिशय मऊ आणि पल्पी असते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला त्याचे काही फायदे सांगणार आहोत, तसेच मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण या फळाचे सेवन करू शकतात की नाही हे जाणून घेऊया. (diabetic patients can eat custard apple just take care of this)

हा ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे- 

सीताफळमध्ये कॅलरीजचे प्रमाण सामान्य सफरचंदच्या तुलनेत खूप जास्त असते. त्यामुळे ते खाल्ल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. त्यात पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. जे स्नायू कमकुवतपणा आणि रक्ताभिसरणासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

अधिक वाचा: Weight Loss Tips: व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही? वजन कमी करण्यासाठी करा घरच्या घरी करा हे सोपे उपाय

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर- 

सीताफळमध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलित प्रमाण असते. जे शरीरातील रक्तदाबाच्या चढउतारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. एक लहान सीताफळ तुम्हाला 10 टक्के मॅग्नेशियम देऊ शकते, जो एखाद्या व्यक्तीसाठी मॅग्नेशियमचा पुरेसा डोस आहे. शरीराच्या अनेक भागांच्या योग्य कार्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच, ते हृदयाच्या स्नायूंना आराम देते आणि स्ट्रोकचा धोका कमी करते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी- 

सीताफळ हे ड्रॅगन फ्रूटपेक्षा जास्त गोड असून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय मानला जात नाही. सीताफळची GI पातळी 54 असते परंतु ग्लायसेमिक लोड 10.2 असतो. जर मधुमेही रुग्णांनी सीताफळाचं मर्यादित प्रमाणात सेवन केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सीताफळ लिपोफेनॉलिक अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. हे इन्सुलिनचे अधिक उत्पादन आणि ग्लुकोजचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

अधिक वाचा: Food For Men: पुरुषांनी मजबूत आणि तंदुरुस्त राहण्यासाठी खावेत हे पदार्थ...

आहार तज्ञ कस्टर्ड सीताफळ थोड्या-थोड्या प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात आणि ते थेट खाण्याऐवजी तुम्ही ते ओटमील, दही आणि स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. 100 ग्रॅम सीताफळमध्ये 20 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते, जे इंसुलिनच्या उत्पादनावर परिणाम करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करते.

पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर- 

सीताफळ खाल्ल्याने अल्सर, पोटाच्या समस्या आणि अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्या टाळता येतात. 100 ग्रॅम सीताफळमध्ये 2.5 पट जास्त फायबर आढळते आणि व्हिटॅमिन सी अर्ध्या संत्र्याइतके असते. तसेच, यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असल्याने आतड्याची हालचाल सुरळीत राहण्यास मदत होते.

अधिक वाचा: दारूचा एक ग्लास, तरूणपणासाठी आहे खास

नैराश्याशी लढण्यासाठी फायदेशीर- 

सीताफळमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून वाचवतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासोबतच ते कॅन्सर आणि कोरोनरी ह्रदयविकार यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही काम करतात. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, सीताफळाच्या पानांमध्ये दाहक-विरोधी, ट्यूमरविरोधी, लठ्ठपणाविरोधी, अँटीऑक्सिडंट, विषाणूविरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात.

सीताफळपासून शरीराला बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मिळतात. हे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व मेंदूतील GABA (गामा-अमीनोब्युटीरिक ऍसिड) चे न्यूरॉन रासायनिक पातळी नियंत्रित करते, जे नैराश्य, तणाव आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारे व्हिटॅमिन बी तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी