ऐकलं का! या मर्यादेपेक्षा कमी स्पर्म काउंट असेल मुल होणं असतं अवघड

युरो न्यूजच्या मते, जर शुक्राणूंची संख्या 40-50 दशलक्ष प्रति मिलीलीटरच्या पातळीवर आली तर ती धोक्याची घंटा आहे. कारण यामुळे मुले होण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सध्याच्या संशोधनानुसार, लॅटिन अमेरिकन देशांपासून ते युरोप, आशियापर्यंतच्या देशांमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी झाली आहे.

 If the sperm count is less than the limit, it is difficult to become a father
मर्यादेपेक्षा कमी स्पर्म काउंट असेल तर बाप होणं आहे कठिण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जगभरात पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
  • पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 104 वरून 49 प्रति मिलीवर आली आहे.
  • शुक्राणूंची संख्या दरवर्षी 2.6 टक्के दराने कमी होत आहे.

Sperm count in Male: नवीन लग्न झालं तर घरातील ज्येष्ठ मंडळी घरात पाळणा कधी हालणार याची विचारणा करत असतात. नवीन संसार फुलवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. परंतु ही बातमी वाचून अनेकांची चिंता वाढणार आहे, विशेषत: पुरुषांची. जगाची लोकसंख्या 800 कोटींवर पोहोचली आहे,  असली तरी पण या नवीन संशोधनाने (research) जगभरातील शास्त्रज्ञांसह (scientists) नागरिकांची झोप उडवली आहे.  ( It is difficult to have a child if the sperm count is less than this limit)

अधिक वाचा  : बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम

ऑक्सफर्ड अकादमिकमध्ये (Oxford Academic) प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जगभरात पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या (Sperm count) झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मानवाच्या प्रजनन दरावर होऊ शकतो. म्हणजेच पुरुषांमध्ये मुले निर्माण करण्याची क्षमता कमी होत आहे. संशोधनानुसार, पुरुषांमध्ये (Men) शुक्राणूंची संख्या 104 वरून 49 प्रति मिलीवर आली आहे. म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक शुक्राणूंची संख्या घटली आहे. हा आकडा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अधिक वाचा  : दर गुरुवारी म्हणा साई बाबांची आरती

अशा प्रकारे कमी होत आहे शुक्राणूंची संख्या 

संशोधनावर युरो न्यूजशी बोलताना शास्त्रज्ञांनी सांगितले की, 1973 ते 2018 या कालावधीत दरवर्षी शुक्राणूंच्या संख्येत सरासरी 1.2 टक्क्यांनी घट झाली होती.  परंतु 2000 नंतर हीच आकडेवारी पाहिली तर शुक्राणूंची संख्या दरवर्षी 2.6 टक्के दराने कमी होत आहे.  या कमतरतेचे कारण काय, याचे ठोस कारण संशोधनातून समोर आलेले नाही. पण जीवनशैली, प्रदूषण आणि रसायनांचा वापरचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे. तसेच शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे टेस्टिक्युलर कॅन्सर इत्यादी गंभीर आजार होण्याचा धोकाही वाढत असतो. संशोधनात जगभरातील 53 देशांतील 57 हजार पुरुषांच्या शुक्राणूंची तपासणी करण्यात आली आहे.

 गर्भधारणेवर होत असतो परिणाम 

युरो न्यूजच्या मते, जर शुक्राणूंची संख्या 40-50 दशलक्ष प्रति मिलीलीटरच्या पातळीवर आली तर ती धोक्याची घंटा आहे. कारण यामुळे मुले होण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सध्याच्या संशोधनानुसार, लॅटिन अमेरिकन देशांपासून ते युरोप, आशियापर्यंतच्या देशांमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी झाली आहे. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 40-50 दशलक्ष प्रति मिलीलीटरच्या खाली गेली तर त्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी