Most powerful Man : जगातील सर्वात शक्तीशाली मनुष्य! वजन 180 किलो, डाएट आहे जबरदस्त

जगातील सर्वात शक्तीशाली ठरलेला पुरुष काय खातो, याची माहिती नुकतीच जाहीर झाली आहे.

Most powerful Man
जगातील सर्वात शक्तीशाली माणसाचे डाएट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यापेक्षा वाढवणे आव्हानात्मक
  • एका आठवड्यात वाढवले 14 किलो
  • रोजच्या आहारात घेतो 8000 कॅलरीज

Most Powerful Man : शरीराचं वाढलेलं वजन कमी करणं जितकं आव्हानात्मक असतं, त्यापेक्षा कित्येक पट अधिक आव्हानात्मक असतं शरीराचं वजन वाढवणं. जगभरातील शरीरसौष्ठवपटू वर्षानुवर्षं मेहनत घेऊन आपलं शरीर तयार करत असतात. रोजचा व्यायाम, योग्य तो आहार आणि आवश्यक तितका आराम यांच्या मदतीने हे मल्ल मेहनत करून आपलं वजन हवं त्या पातळीला नेण्यात यशस्वी होतात. मात्र सध्या एका बॉडीबिल्डरबाबत जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या पठ्ठ्यानं केवळ एका आठवड्यात 14 किलो वजन वाढवलं. हा प्रोफेशनल खेळाडू दैनंदिन 8 हजार कॅलरी अन्नाचं सेवन करतो. मात्र वजन वाढवण्यासाठी त्याने त्याने हे प्रमाण 15 हजार कॅलरीपर्यंत नेलं. त्यामुळेच एका आठवड्यात 14 किलो वाढवण्यात तो यशस्वी ठरला. 15 हजार कॅलरी हे सामान्यतः 8 लोकांच्या आहाराचं प्रमाण आहे. एवढा आहार हा एकटाच करत होता. या बहाद्दराचं नाव आहे टॉम स्टोल्टमन. टॉमला जगातील सर्वाधिक शक्तीशाली पुरुष असण्याचा बहुमान मिळाला आहे. आतापर्यंत दोन वेळा त्याने हा खिताब पटकावला आहे.

एका आठवड्यात वजन वाढवून विजय

यंदा कॅलिफोर्नियात झालेल्या स्ट्रॉंगेस्ट मॅन स्पर्धेत टॉमनं सलग दुसऱ्या वर्षी पहिला नंबर पटकावला आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला 14 किलो वजन वाढवण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. हे टार्गेट मला एका आठवड्यात पूर्ण करायचं होतं. मात्र इंग्लंडच्या तुलनेत अमेरिकेत हे टार्गेट पूर्ण करणं अधिक सोपं होतं. अमेरिकेत एका डाएटची म्हणजेच सर्व्हिंगचं पोषणमूल्य हे इंग्लंडमधील सर्व्हिंगपेक्षा अधिक असतं. त्यामुळे अमेरिकेत तुम्हाला खूप प्लेट मागवाव्या लागत नाहीत, असं टॉम म्हणतो. 

अधिक वाचा - Unexplained Weight Loss : व्यायाम आणि डाएटशिवाय आपोआप कमी होतंय वजन? असू शकतात गंभीर कारणं

असा आहे टॉम

टॉमची उंची आहे 6 फूट 8 इंच. त्याचं वजन आहे 180 किलो. दररोज 8000 कॅलरी खाणारा टॉम स्पर्धेच्या काळात मात्र 15 हजार कॅलरी खातो. कॅलरीचा इनटेक वाढवण्यासाठी त्याने केवळ अमेरिकन सर्व्हिंग खाणं सुरू केलं. त्यातून आपल्याला पुरेशा कॅलरीज मिळत गेल्या, असं टॉम सांगतो. टॉम हा ब्रेकफास्टसाठी स्ट्रॉबेरी, केळ आणि मध यासह पॅनकेक्सवर आडवा हात मारतो. दुपारी तो तीन बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खातो. रात्री पास्ता खातो आणि स्विट डिश म्हणून एक चॉकलेट केकही खातो.

अधिक वाचा - Child Health : मुलांच्या मानसिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी खायला द्या या गोष्टी

बर्गरचा चाहता टॉम

स्पर्धा असो की नसो, टॉमच्या रोजच्या आहारात बर्गरचा समावेश हमखास असतो. जेव्हा जेव्हा वजन वाढवण्याची किंवा कमी करण्याची गरज असते, तेव्हा तेव्हा तो त्याच्या डाएटिशियनचा सल्ला घेतो. याशिवाय आठ अंडे, चार रोट्या आणि मशरुम या गोष्टी त्याच्या आहारात असतातच. त्याशिवाय तीन स्कूप व्हे प्रोटिन पावडर, फळं तो खातो. कधीकधी स्ट्रॉबेरी किंवा केळाचं शेक करून ते पितो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी